शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीला ठार मारणाऱ्या प्रियकरासह दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 20:11 IST

नाशिक : अनैतिक संबंधातून प्रेयसीचा पती दशरथ ठमके यास मद्य पिण्याच्या बहाण्याने नेऊन धारदार शस्त्राने वार करून ठार मारणारा प्रियकर गणेश वसंत गरड (२२, रा़ नागचौक, जोशीवाडा, पंचवटी) व त्याचा साथीदार सुनील रामदास अहिरे (२९, रा़ फुलेनगर, पंचवटी) या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़गिमेकर यांनी मंगळवारी (दि़२५) जन्मठेप व प्रत्येकी ३० हजार रुपये दंडाची शिक्षा तर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली़ सरकारी वकील रविंद्र निकम यांनी या खटल्यात बारा साक्षीदार तपासले़

ठळक मुद्देपेठरोडवरील घटना : खून करून पाण्याच्या टाकीत मृतदेहाची विल्हेवाट

नाशिक : अनैतिक संबंधातून प्रेयसीचा पती दशरथ ठमके यास मद्य पिण्याच्या बहाण्याने नेऊन धारदार शस्त्राने वार करून ठार मारणारा प्रियकर गणेश वसंत गरड (२२, रा़ नागचौक, जोशीवाडा, पंचवटी) व त्याचा साथीदार सुनील रामदास अहिरे (२९, रा़ फुलेनगर, पंचवटी) या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़गिमेकर यांनी मंगळवारी (दि़२५) जन्मठेप व प्रत्येकी ३० हजार रुपये दंडाची शिक्षा तर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली़ सरकारी वकील रविंद्र निकम यांनी या खटल्यात बारा साक्षीदार तपासले़

पेठरोडवरील गजानन चौकातील रहिवासी दशरथ बाळू ठमके याच्या पत्नीचे आरोपी गणेश गरड सोबत प्रेमसंबंध होते़ याची माहिती ठमके यास मिळाल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाले होते़ त्यावेळी ठमके याने गरड यास माझ्या पत्नीचा नाद सोडून दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही गरड यास दिली होती़ या गोष्टीचा राग गरड याच्या मनात असल्याने २१ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दशरथ ठमके यास दारू पाजण्याच्या बहाण्याने पेठरोडवरील शरदचंद्र मार्केट यार्ड येथील पाण्याच्या टाकीजवळ घेऊन गेला़ आरोपी गरड सोबत सुनील रामदास अहिरे, राहुल उर्फ भुºया भिमा लिलके (१९, रा़ एरंडवाडी, म्हसोबा चौक, पंचवटी), उमेश डॅनियल खंदारे (२४, रा़ कालिकानगर, पंचवटी) व सुशील उर्फ श्याम मधुकर बागूल (३१, रा़ गजानन चौक, दिंडोरी रोड) हे साथीदार देखील होते़

ठमके यास दारु पाजल्यानंतर आरोपी गरड व त्याच्या साथिदारांनी चॉपरने छातीवर, गळ्यावर व पोटावर वार करून ठार मारले़ यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मयत ठमकेच्या पायाला दोरी बांधून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला़ २१ तारखेपासून घरातून गेलेला भाऊ घरी न परतल्याने २३ आॅक्टोबरला भाऊ संतोष ठमके याने पंचवटी पोलीस ठाण्यात दशरथ ठमके हा बेपत्ता असल्याची तक्रार केली होती़ तसेच २१ तारखेला गरडसोबत गेल्याची माहिती पोलिसांनी दिली होती़ त्यानुसार पंचवटीचे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व पोलीस उपनिरीक्षक योगेशउबाळे यांनी २७ आॅक्टोबरला आरोपी गरडला ताब्यात घेतल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला, त्याने मृतदेह पाण्याचा टाकीत टाकल्याची माहिती दिली़ त्यानुसार पोलिसांनी तपास केल्यानंतर मृतदेह आढळून आला होता़जन्मठेप आणि प्रत्येकी ३० हजार रुपये दंडसरकारी वकिल रविंद्र निकम यांनी केलेला युक्तीवाद तसेच परिस्थ्लिृतीजन्य पुरावे व तपासलेले बारा साक्षीदार याआधारे दोघांनी दशरथ ठमकेचा खून केल्याचे स्पष्ट झाले. न्यायाधीश गिमेकर यांनी आरोपी गरड व अहिरे या दोघांनाही जन्मठेप आणि प्रत्येकी ३० हजार रुपये दंड ठोठावला. गुन्हा शाबित होण्यासाठी पैरवी अधिकारी पोलीस नाईक एस. एल. जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. शिंदे, पोलीस शिपाई आर. आर. जाधव यांनी प्रयत्न केले़

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिकMurderखून