शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडच्या कोविड रुग्णालयाचा परवाना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 01:39 IST

शहरातील दोन रुग्णालयांपाठोपाठ महापालिकेने नाशिकरोड येथील केअर  ॲण्ड क्युअर या रुग्णालयाचा कोविड रुग्णालय म्हणून असलेला परवाना रद्द केला आहे. त्यामुळे आणखी एका खासगी रुग्णालयाला दणका देण्यात आला आहे. 

नाशिक : शहरातील दोन रुग्णालयांपाठोपाठ महापालिकेने नाशिकरोड येथील केअर  ॲण्ड क्युअर या रुग्णालयाचा कोविड रुग्णालय म्हणून असलेला परवाना रद्द केला आहे. त्यामुळे आणखी एका खासगी रुग्णालयाला दणका देण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात गंगापूर रोडवरील मेडिसीटी आणि पंचवटीतील रामालयम रुग्णालयाचा परवाना रद्द केला आहे. त्याचवेळी नाशिकरोडच्या केअर ॲण्ड क्युअर रुग्णालयाचादेखील परवाना रद्द करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या. शासन नियमानुसार रुग्णालयात ८० टक्के रुग्ण हे महापालिकेच्या आरक्षित कोट्यातून भरून त्यानुसार यांच्याकडून फी आकारणी करणे बंधनकारक आहे.nसंबंधित रुग्णालयांकडून महापालिकेच्या ऑडिटर्सला कच्ची बिलेच देण्यात येत होते. बिले तपासून ती नियमानुसार आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठीच महापालिकेने ऑडिटर्स नियुक्त केले असताना त्यांनाच टाळाटाळ करण्यात आल्याचे महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक बी.जी. सोनकांबळे यांनी सांगितले.nपक्की बिले न देता साध्या कागदावरच बिले देणे तसेच बिले तपासणीसाठी न देणे या कारणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. रुग्णांचे उपचार पूर्ण करून त्यांना घरी जाऊ द्यावे; प्रलंबित रुग्णांची बिले सादर करावीत, असे आदेशही या रुग्णालयाला देण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल