व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:32+5:302021-05-17T04:13:32+5:30

नाशिक - नाशिकमधील व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत नाशिकमधील कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे ...

Let's make a positive decision about starting a business | व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ

व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ

Next

नाशिक - नाशिकमधील व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत नाशिकमधील कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा, संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले आहे.

लॉकडाऊनमुळे नाशिकमधील व्यापार, उद्योग मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर व्यापार उद्योग सुरू करण्यासाठी व व्यापाऱ्यांच्या विविध अडचणी संदर्भात महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखालील नाशिकमधील विविध व्यापारी संघटनांच्या शिष्टमंडळाने रविवारी (दि. १६) भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मंडलेचा नाशिकमधील व्यापारी संघटनांच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी मांडलेल्या विविध अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. यात प्रामुख्याने व्यापार सुरु करण्यास परवानी मिळण्यासोबतच व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळणे, वीज बिल, मालमत्ता कर, बँक कर्जावरील व्याज माफ करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या गाळ्यांचे तीन महिन्यांचे भाडे माफ करणे, जीएसटी, इन्कम टॅक्स अशा विविध स्वरूपाचे कर भरण्यासाठी सप्टेंबर २१ पर्यंत मुदत द्यावी, लघु व मध्यम व्यापाऱ्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या १० टक्के रक्कम वार्षिक ३ टक्के व्याजाने कर्ज रूपाने द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. त्यावर व्यापाऱ्यांच्या अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे देण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारिणी सदस्य सचिन शहा, ऑटोमोबाईल्स असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश आचरा, ऑटोमोबाईल्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश चावला, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, नाशिक किरकोळ किराणा धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पटेल, नाशिक घाऊक किराणा धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, दि नाशिक रिटेल क्लाथ मर्चंट्स असोसिएशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर संपत काबरा, नरेश पारख, तुषार मणियार, व्यापारी संजय सोनवणे, मेहुल थोरात, चेंबरचे सहायक सचिव अविनाश पाठक आदी उपस्थित होते.

Web Title: Let's make a positive decision about starting a business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.