शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्हाला फक्त शिकवू द्या...!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:14 IST

‘आता आम्हाला फक्त शिकवू द्या...’ असे आर्जव करत बीएलओ आणि अन्य अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी (दि. १) नांदगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआर्जव। शिक्षक समितीचे नांदगावी धरणे आंदोलन

साकोरा : ‘आता आम्हाला फक्त शिकवू द्या...’ असे आर्जव करत बीएलओ आणि अन्य अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी (दि. १) नांदगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाबाबत भूमिका मांडताना सांगितले, शिक्षकांचे मुख्य काम अध्यापन असताना त्यांना बीएलओ व इतर अशैक्षणिक कामे भरपूर प्रमाणात देण्यात येतात. परिणामी शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. त्याची झळ प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बसत असते. जनगणना व निवडणूक ही दोनच कामे प्रामुख्याने बांधील असताना अन्य अशैक्षणिक कामाने शिक्षण क्षेत्रात बाधा आणली आहे. सर्वच माहिती आॅनलाइन व ताबडतोब द्यावी लागत असल्याने यंत्रणेवर ताण पडत आहे. सदर अशैक्षणिक कामांच्या जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी धरणे आंदोलनात शिक्षक समितीच्या नांदगाव शाखेचे अध्यक्ष रवींद्र बोरसे, मवाळ, सरचिटणीस अनिल बोरसे, जिल्हा पदाधिकारी संजय बच्छाव, राजेंद्र कदम, अनिल धोंडगे, संजय शेवाळे, धोंडीराम पठाडे, राजकुमार बोरसे, गौतम पाटील, आर.आर. बोरसे, सुरेश मोरे, प्रेमसिंग जाधव, शिक्षक भारतीचे पाटील, पदवीधर संघटनेचे प्रकाश मोरे, जुनी पेन्शन संघटनेचे विजय तुरकुने यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकStrikeसंप