शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

होऊ आम्ही नीतिवंत.. कलागुणी बुद्धिवंत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 21:34 IST

वडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे जोरात सुरू आहेत. आपल्या शेतात रब्बीच्या पेरणीत मग्न असलेल्या शेतकर्यास आपल्या मुलीने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातल्याची माहिती मिळते अन् आभाळच ठेंगणं झाल्याचा आभास होतो.

ठळक मुद्देखाकुर्डी येथील जयश्री ठाकरे, पाटोळेचा गणेश खताळेची उपजिल्हाधिकारीपदी भरारी

लोकमत न्यूज नेटवर्कवडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे जोरात सुरू आहेत. आपल्या शेतात रब्बीच्या पेरणीत मग्न असलेल्या शेतकर्यास आपल्या मुलीने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातल्याची माहिती मिळते अन् आभाळच ठेंगणं झाल्याचा आभास होतो.हे बोलके चित्र आहे मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी गावातील आदर्श शेतकरी म्हणून परिचित असलेल्या सुरेश शिवाजी ठाकरे यांच्या घरचे. भूमिकन्या डॉ. जयश्री ठाकरे यांनी उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. या निकालाने तालुक्याला सुखद धक्का दिला आहे.डॉ. जयश्री या ओबीसी संवर्गातून राज्यातून मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. जयश्रीने प्राथमिक शिक्षण अंबासनच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतून केल्यानंतर आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर नवोदय परीक्षा पास करत माध्यमिक शिक्षण दिंडोरी(नाशिक) येथील नवोदय विद्यालयात पूर्ण केले आहे. तर पुढील वैद्यकीय शिक्षण बीएएमएस सावंतवाडी जि. रत्नागिरी येथे पूर्ण केले. याआधी 2017 मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत त्यांची मुंबई मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्त झाली होती. त्याचे प्रशिक्षण सुरू आहे. यामध्येच ही नवी आनंदाची बातमी मिळाली आहे.

सिन्नर : विडी वळण्याचे काम करणारी आई आणि शेती करणारे वडील, आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची, शिवाय दुष्काळ पाचवीला पुजलेला. अशा बिकट परिस्थितीतून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मार्ग काढत जिद्द, चिकाटी आणि अभ्यास या त्रिसुत्रीचा अवलंब करत तालुक्यातील पाटोळे गावचा गणेश तुकाराम खताळे याने उपजिल्हाधिकारी पदावर यशाची मोहर उमटवली आहे.पाटोळे गावासह तालुक्याच्या नावलौकीकात मानाचा तुरा खोवला आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत त्यांनी 17 वे स्थान पटकाविले असून इतर मागास प्रवर्गात ते राज्यात दुसर्याक्र मांकाने उत्तीर्ण झाला आहे. गणेश यांनी आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही अहोरात्र कष्ट उपसत उच्च दर्जाचे शिक्षण घेतले. गणेशचे प्राथमिक शिक्षण पाटोळे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, माध्यमिक शिक्षण मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयात तर बारावी सायन्स पर्यंतचे शिक्षण सिन्नर महाविद्यालयात झाले. त्यानंतर नाशिकच्या के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरींगची पदवी संपादन केली. त्यानंतर रेंज फॉरेस्ट आॅफिसर, 2017 साली कक्ष अधिकारी पदावर यश संपादन केले. सध्या ते मंत्रालयात कक्ष अधिकारी असतानाही हे यश मिळविले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी