शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

‘मानवधन’च्या शिक्षकांनी  गिरवले ‘इंटिग्रल’ शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:27 IST

प्रात्यक्षिकांचा अंतर्भाव, खेळ, नावीन्यपूर्ण उपक्र म, योगा यांसह दृकश्राव्य माध्यमांद्वारे ज्ञानार्जन करून मानवधन संस्थेच्या शिक्षकांनी इंटिग्रल शिक्षण पद्धतीची तीन मूलभूत तत्त्वे समजून घेतली.

नाशिक : प्रात्यक्षिकांचा अंतर्भाव, खेळ, नावीन्यपूर्ण उपक्र म, योगा यांसह दृकश्राव्य माध्यमांद्वारे ज्ञानार्जन करून मानवधन संस्थेच्या शिक्षकांनी इंटिग्रल शिक्षण पद्धतीची तीन मूलभूत तत्त्वे समजून घेतली.  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बेजन देसाई फाउंडेशन व मानवधन सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने इंटिग्रल शिक्षणावर आधारित सातदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मानवधन संस्थेच्या विविध शाळांतील शिक्षकांनी या समग्र शिक्षण पद्धतीचे (इंटिग्रल) स्वरूप समजून घेतले. या कार्यशाळेसाठी पाँडेचेरी येथील अरविंदो सोसायटी शिक्षण संस्थेचे संचालक शिवकुमार यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिवकुमार यांच्यासोबत तज्ज्ञ मार्गदर्शकही सहभागी झाले होते. या कार्यशाळेसाठी संस्थापक प्रकाश कोल्हे, बेजान देसाई फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज टिबरेवाल, आश्विनीकुमार भारद्वाज, ज्योती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवताना त्यांचा भावनिक, बौद्धिक व शारीरिक विकास घडवून आणला पाहिजे. तसेच मूल्यशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांवर संस्कारही घडवले पाहिजे. या सर्वांचा अंतर्भाव करूनच अध्ययन व अध्यापन झाले तर आदर्श समाजनिर्मिती होऊ शकते, असेही यावेळी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.दृकश्राव्य पद्धतीने प्रशिक्षणकार्यशाळेत शिवकुमार यांनी इंटिग्रल शिक्षणाचे स्वरूप, संकल्पना, तीन मूलभूत तत्त्वे उलगडून सांगितली. तसेच मुंबई येथील रिद्धी शहा, जास्मीन संपत यांनी प्रात्यक्षिके, खेळ, उपक्र म, योगा व दृकश्राव्य प्रत्यक्ष अनुभव या पद्धतीने शिक्षकांना प्रशिक्षण दिले.

टॅग्स :Teacherशिक्षक