शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरच्या साहाय्याने महिलांना दिले मशागतीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 17:32 IST

सिन्नर : पुुरूषांच्या खांद्याला खांदा लावून शेतीकाम करणाऱ्या बहुतेक महिला शेतकरी बैलजोडीची अवजारे शेतात चालवितात. मात्र, आधुनिक काळात बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. महिलांनाही ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करता यावी, या उद्देशाने बायफ संस्थेने घेतलेल्या पेरणीपूर्व मशागत वर्गात बचत गटाच्या महिलांना ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण दिले.

महिला स्वावलंबनाचा त्यामागे हेतू आहे. महिंन्द्रा आणि महिन्द्रा पुरस्कृत व बायएफ सिन्नर संचालित प्रेरणा प्रकल्पा अंतर्गत दोन दिवस मनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यात खरीप हंगामासंदर्भात दोन दिवसांचे शेतीविषयक खरीप पूर्व मशागतीचे प्रशिक्षण देण्यात आले. खरीप हंगामासंदर्भात सोयाबीन व वटाणा या पिकांविषयी शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. त्यात शेतीची मशागत, बीज प्रक्रि या, लागवड पद्धती, आंतर मशागत, खत व पाणी व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतात जावून महिलांना औजारांसह ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण देत त्यांच्याकडून प्रात्यक्षिकही करून घेण्यात आले. महिन्द्रा अँड महिन्द्राचे प्रकल्प प्रमुख राहुल शहा, पूणे येथील बाएफचे प्रशांत दुधाडे, सागर कडाव, रामप्रसाद, योगेश कानगुडे, सुजाता कानगुडे यांनी मार्गदर्शन केले. सिन्नरच्या बायफ प्रकल्प टीमने प्रशिक्षणाचे नियोजन केले होते. मनेगाव, आटकवडे, धोंडवीरनगर, पाटोळे, बारागावपिंप्री आणि देशवंडी येथील महिला बचत गटाच्या महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

टॅग्स :FarmerशेतकरीWomenमहिला