नाशिक : निफाड व येवला तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्यात १५ ते ३० मार्च या कालावधीत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेच्या नियोजनाबाबत अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.पी. जगदाळे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवि चौधरी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.एस.एस. धनेश्वर, जिल्हा आशा समन्वयक शालिनी कदम, सहायक संचालक डॉ. पी.एम. पाडवी उपस्थित होेते. या मोहिमेंतर्गत ७६०८ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ३८०२ पथकांद्वारे जिल्ह्यातील १२ लाख घरांना भेट देऊन नागरिकांची तपासणी करण्यात येईल. मोहिमेसाठी जाणाऱ्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांची फेब्रुवारी महिन्यात आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयनिहाय पूर्वतयारी करण्यात आली आहे. प्रत्येक घराला भेट देऊन ही पथके घरातील व्यक्तींची तपासणी करतील. (वार्ताहर)
जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम
By admin | Updated: March 16, 2016 08:27 IST