सटाणा : तालुक्यातील कºहे शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या एक मादी बिबट्या व तिच्या चार बछड्यांपैकी तिसºया बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सोमवारी सायंकाळी येथील कामपीर बाबा डोंगराच्या पायथ्याशी लावण्यात आलेल्या पिंजºयामध्ये बिबट्या जेरबंद झाला.तीन ते चार महिन्यांपासून कºहे येथील कामपीर बाबा डोंगर परिसरात मादी बिबट्या व तिच्या चार बछड्यांनी धुमाकूळ घालून अनेक शेळ्या, मेंढ्या, कुत्र्यांना आपले भक्ष बनविले होते. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली असून, वनविभागाने येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या रवींद्र बाबूलाल जाधव यांच्या घरासमोर पिंजरे लावले असून, त्यात अकरा महिने वयाच्या बछड्याला जेरबंद करण्यात यश आले.परिसरात अद्याप एक मादी बिबट्या व तिचा आणखी एक बछडा असून, तीन बछडे पकडले गेल्याने मादी अधिकच खवळली असून, दिवसाढवळ्याही डोंगरावर दर्शन देत असल्यामुळे परिसरात दहशत कायम असल्याचे मनोहर सोळंके, सतीश सोळंके या शेतकºयांनी सांगितले.
कामपीर डोंगराजवळ बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 21:09 IST
सटाणा : तालुक्यातील कºहे शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या एक मादी बिबट्या व तिच्या चार बछड्यांपैकी तिसºया बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सोमवारी सायंकाळी येथील कामपीर बाबा डोंगराच्या पायथ्याशी लावण्यात आलेल्या पिंजºयामध्ये बिबट्या जेरबंद झाला.
कामपीर डोंगराजवळ बिबट्या जेरबंद
ठळक मुद्देअकरा महिने वयाच्या बछड्याला जेरबंद करण्यात यश