शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

नासलगावात गर्दीमुळे बिबट्या बिथरला; युवकाला मारला पंजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 15:57 IST

बिबट्याच्या मागे गावकºयांनी धावाधाव करून परिस्थिती अधिक गंभीर बनवू नये, बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाकडून करण्यात येईल, तोपर्यंत संयम ठेवावा,

ठळक मुद्देनैसर्गिक नाल्यालगत वृक्षावर घेतला होता आश्रयया भागात लवकरच पिंजरा तैनात करण्यात येणार

नाशिक: तालुक्यातील पश्चिम भागात गंगापूर धरणाला लागून असलेल्या पिंपळगाव गरूडेश्वरजवळील नासलगाव शिवारातील एका नैसर्गिक नाल्यात बाभळीच्या वृक्षांच्या आडोशाला बिबट्याने काही गावकऱ्यांना दर्शन दिल्याने परिसरातील गावकऱ्यांची झुंबड बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी नाल्याकडे निघाली. दरम्यान, बिथरलेल्या बिबट्याने नाल्यातून पळून जात असताना अचानकपणे समोर आलेल्या एका ३३ वर्षीय युवकाला पंजा मारल्याची घटना सोमवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास घडली.नाशिक पश्चिम वनविभागाच्या सातपूर परिमंडळातील शिवणगाव बीटात असलेल्या नासलगाव शिवारातील लोकवस्तीपासून वाहणा-या दीड ते दोन किलोमीटर अंतरावर एका नाल्यात बिबट्या दडून बसलेला असल्याचे काही ग्रामस्थांना दिसून आले. पोलीस पाटलांनी याबाबत तत्काळ वनविभागाला माहिती कळविली. माहिती मिळताच वनपाल ओंकार देशपांडे हे वनरक्षकांसह घटनास्थळी पोहचले. यावेळी बघ्यांची गर्दी प्रचंड असल्यामुळे वनकर्मचाºयांना गर्दीवर नियंत्रण मिळविणे अवघड होत होते. अखेर पोलीस पाटलांच्या मदतीने तत्काळ गिरणारे पोलीस ठाण्याला संपर्क साधण्यात आला आणि गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीसांची मदत मागितली गेली. काही वेळेत पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरीदेखील काही अतिउत्साही युवक पोलीस, वनविभागाच्या कर्मचा-यांना न जुमानता हातात लाठ्या-काठ्या घेत बिबट्याच्या दिशेने धावू लागले. यावेळी बिथरलेल्या बिबट्याने शांताराम बाळू दोबाडे (३३) या युवकाला पळताना पंजा मारला. यामुळे त्याच्या हाताचे कोपर जखमी झाले. त्याला तत्काळ ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले. पंजा मारल्यामुळे नखे लागली असून त्याची प्रकृती चांगली आहे. बिबट्या जेरबंद करण्याची मागणी गावक-यांकडून करण्यात आली आहे. या भागात लवकरच पिंजरा तैनात करण्यात येणार आहे. बिबट्याच्या मागे गावक-यांनी धावाधाव करून परिस्थिती अधिक गंभीर बनवू नये, बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाकडून करण्यात येईल, तोपर्यंत संयम ठेवावा, जेणेकरून बिबट्या अधिक आक्रमक होणार नाही, असे आवाहन उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव