शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने पाडला बैलाचा फडशा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 00:43 IST

त्र्यंबकेश्वर : बुधवारी(दि.२) मौजे खरवळ येथे सोमा काशीराम मौळे यांच्या शेतात पहाटेच्या सुमारास बिबट्याने आंब्याच्या वाडीत बैल ठार केला. त्याला सोडवण्यासाठी गेले असता तो रमेश मौळे यांच्यावर धाऊन गेल्याने त्यांना पळ काढावा लागला. या घटनेनंतर बैलाचा पंचनामा करण्यात आला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ परिसरात या घटनेमुळे बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी उपसरपंच गोकुळ गारे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : पिंजरा लावण्याच्या मागणीला जोर

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : बुधवारी(दि.२) मौजे खरवळ येथे सोमा काशीराम मौळे यांच्या शेतात पहाटेच्या सुमारास बिबट्याने आंब्याच्या वाडीत बैल ठार केला. त्याला सोडवण्यासाठी गेले असता तो रमेश मौळे यांच्यावर धाऊन गेल्याने त्यांना पळ काढावा लागला. या घटनेनंतर बैलाचा पंचनामा करण्यात आला.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ परिसरात या घटनेमुळे बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी उपसरपंच गोकुळ गारे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.वर्षभरापासुन संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात किमान सात आठ बिबट्यांचा वावर तालुक्यातील वावीहर्ष परिसरापासुन ते गडदवणे परिसरापर्यंत बिबटे फिरत असुन ब्रम्हगिरीच्या भातखळ्यात बिबट्याने गाय ठार केली होती. यापुर्वी येथील ब्रम्हगिरीच्या रस्त्यावर मध्यभागी असलेल्या मुक्तादेवीच्या मंदीराजवळ रात्री बिबट्याने एक गाय ठार केली होती.दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यात व परिसरात बिबटे, तरस, मोर,ससे, रानडुकरे आदी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात बिबटे जनावरांचा फडशा पाडत शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. बेझे, चाकोरे, वाघेरा, वळणगावचे पाडे आदी ठिकाणी घटनाघडल्या आहेत. चार महिन्यां पुर्वी नाशिक त्र्यंबक रस्त्यावर एक बिबट्या अज्ञात वाहन धडकेने बिबट्या ठार झाला होता.चौकट...तालुक्यात वन्य प्राण्यांसाठी जंगलात वनतळे जलाशय राखुन ठेवले आहेत. जंगलात नजीकच्या गावातील मोकाट जनावरे चरण्यासाठी गेली की अशा बिबटे व रान डुकरांकडून ते शिकार होतात. जंगल परिसर वन्य प्राण्यांसाठी संरक्षित असते. यास्तव मालकांनी जनावरांना मोकाट न सोडता गावातच चरण्यास सोडावे असे वन परिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल