शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधातील बिबट्या पडला विहिरीत, वनविभागाची धाव अन् सुटका

By धनंजय वाखारे | Updated: September 21, 2023 17:13 IST

नाशिक जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटना

सचिन सांगळे 

नांदूरशिंगोटे (नाशिक) : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी विहिरीत पडलेल्या बिबट्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले. सिन्नर तालुक्यातील कासारवाडी भागात भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना बुधवारी (दि. २०) रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने विहिरीला पाणी नसल्याने बिबट्याने कपारीचा आधार घेत संपूर्ण रात्र विहिरीत काढली. 

गुरुवारी (दि.२१) दुपारी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत क्रेनच्या साहाय्याने बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढत जेरबंद केले. भागवत सीताराम साळुंखे यांच्या शेतजमिनीत ७० ते ८० फूट जुनी पडकी विहीर असून विहिरीच्या भोवतालीच गाजर गवताचा वेढा पडलेला आहे. भोजापूर परिसरात पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने या विहिरीच्या केवळ तळालाच पाणी साचलेले होते. परिसरात ऊस व मकाचे क्षेत्र आहे. त्यामुळे याठिकाणी बिबट्यांचा संचार असतो. बुधवारी रात्रीच्या वेळी विहिरीचा अंदाज न आल्याने बिबट्या थेट पाण्यात पडला. रात्रभर कपारीचा आश्रय घेतलेला बिबट्या सकाळी निदर्शनास आल्यानंतर वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबविले, तर दुसऱ्या घटनेत येवला तालुक्यातील विसापूर येथे साठ फूट विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाला यश आले. 

दरम्यान, गुरुवारी (दि.२१) विसापूर येथील शेतकरी संतोष सीताराम सोनवणे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करीत जाळीच्या साहाय्याने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. 

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या