शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Video - नाशिकमध्ये द्राक्षाच्या मळ्यात बिबट्या फसला जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 13:00 IST

नाशिकरोड जवळ चाढेगाव येथे द्राक्ष मळ्यात डुकरांना पायबंद घालण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात मंगळवारी (27 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास बिबट्या अडकला. सुटकेसाठी बिबट्याची झटापट सुरू असताना त्याच्या डरकाळ्या शेतकऱ्यांना ऐकू आल्या. 

ठळक मुद्देनाशिकरोड जवळ चाढेगाव येथे द्राक्ष मळ्यात डुकरांना पायबंद घालण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात बिबट्या अडकला.बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठया कौशल्याने ट्रेनकुलाईझ गन ने डार्क देऊन बेशुद्ध केले. यशस्वीपणे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले असून बिबट्याला पिंजऱ्याद्वारे हलविण्यात आले आहे.

नाशिक : नाशिकरोड जवळ चाढेगाव येथे द्राक्ष मळ्यात डुकरांना पायबंद घालण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात मंगळवारी (27 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास बिबट्या अडकला. सुटकेसाठी बिबट्याची झटापट सुरू असताना त्याच्या डरकाळ्या शेतकऱ्यांना ऐकू आल्या. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. नाशिक पश्चिम उपवनसंरक्षक टी. बिउला एलिल मती यांनी तत्काळ रेस्क्यू पथकाला घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले. अवघ्या काही मिनिटांत वनविभागाचे अधिकारी कर्मचारी मळ्यात पोहोचले.

बिबट्याला सुरक्षित जेरबंद करण्याचे आव्हान वनविभागाच्या पथकापुढे उभे राहिले होते. मात्र बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठया कौशल्याने ट्रेनकुलाईझ गन ने डार्क देऊन बेशुद्ध केले. यशस्वीपणे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले असून बिबट्याला पिंजऱ्याद्वारे हलविण्यात आले आहे. दरम्यान, नाशिकरोड पोलीस पथक ही घटनास्थळी बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोहोचले होते. जाळ्यात बिबट्या फसल्याने तो जास्त आक्रमक झाला आहे. सुमारे पाच ते सहा तासापूर्वी तो जाळ्यात अडकला असावा असे बोलले जात आहे. नाशिकरोड जवळील सामनगाव, चाडेगाव, गोरेवाडी, एकलहरा रोड, पळसे या मळे भागत, मोकाट कुत्रे, डुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्या द्राक्ष मळ्यात पोहचला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. दरम्यान, या भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मळे भागात पिंजरा तैनात करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक