शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने पाडला वासराचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 00:07 IST

मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात बिबट्याची दहशत कायम असून मंगळवारी (दि.६) पुन्हा डोंगरगाव येथील शेतकरी दादाजी सावंत यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासराचा फडशा पाडला आहे.

ठळक मुद्देमहिन्यातील तिसरी घटना : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात बिबट्याची दहशत कायम असून मंगळवारी (दि.६) पुन्हा डोंगरगाव येथील शेतकरी दादाजी सावंत यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासराचा फडशा पाडला आहे.

महिन्यातील ही तिसरी घटना आहे. मागील पंधरवड्यात डोंगरगाव येथील जखमी बिबट्या सापडला होता. मेशी, डोंगरगाव परिसराला सुमारे बाराशे हेक्टरचे विस्तीर्ण जंगल आहे. यामुळेच या परिसरात नेहमी बिबट्यांचा वावर असतो. अनेक वेळा गुरे, शेळ्या, मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले आहे.सोमवारी (दि.५) रात्री मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून वासरू ठार करूनच जवळचे झुडपात फरपटत ओढत नेले. सकाळी शेतकरी उठल्यानंतर गोठ्यात वासरू न दिसता रक्ताचे थारोळे दिसले तसेच फरपटत ओढत नेल्याच्या खुणा व बिबट्याच्या पायाचे ठसे उमटलेले दिसले. ठशांच्या मागावरून तपास करत काही अंतरावर झुडपात शरीराचे लचके तोडलेले वासरू निदर्शनास पडले. त्यामुळे बिबट्याचा अजूनही परिसरात वावर असल्याची खात्री झाली.डोंगरगाव वनसमितीचे अध्यक्ष लालजी सावंत, सरपंच दयाराम सावंत, पोलीस पाटील प्रल्हाद केदारे यांनी वनविभागाला माहिती कळविली आहे. विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सदर घटनेमुळे शेतात राहणारे शेतकरी भयभीत झाले आहे त्यामुळे वनविभागाने याची दखल घेण्याची मागणी केली जात आहे.(०७ मेशी)बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेले वासरु.

टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरी