तारुखेडले : येथे राजेंद्र पवार आणि मोहन पवार यांच्या गट न ३६५ मध्ये विहीर आहे. गुरुवारी सकाळी पवार यांच्या विहिरीतील पाण्यात बिबट्या मृत झाल्याचे पवार कुटुंबियांच्या लक्षात आले हि घटना येवला वनविभागाला कळवण्यात आली त्यानंतर तातडीने येवला वनविभागाचे वन परिमंडळ अधिकरी बी.आर. ढाकरें, वनपाल विजय टेकणर,वनसेवक दिलीप अिहरे,विजय लोंढे, भैया शेख, मधुकर शिंदे आदींचे पथक घटना स्थळी पोहचले त्यानंतर विहिरीतुन दोरखंडाला बॅर्रेट बांधून त्याच्या साहाय्याने मृत बिबट्याला बाहेर काढले मृत बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या पथकाला अक्षय पवार,अनंत जगताप,प्रतीक पवार, प्रज्वल जगताप,पिंटू पालवे,मुरलीधर शिंदे, मधुकर पवार नारायण जगताप रवींद्र जगताप,लक्ष्मण पवार यांचे सहकार्य लाभले सदर मृत बिबटया हा नर असून तो ३ ते ४ वर्षाचा असून तो ४ दिवसापासून विहिरीत पडला असावा असे वन अधिकारी यांनी सांगितले. (वार्ताहर)
विहिरीत पडून बिबट्या मृत
By admin | Updated: August 5, 2016 01:09 IST