शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 17:11 IST

सिन्नर : तालुक्यातील शहा येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. (दि. २१) पहाटे उघडकीस आली.

सिन्नर : तालुक्यातील शहा येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. (दि. २१) पहाटे उघडकीस आली. नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असला तरी त्याच्यासोबत असलेली मादी व बछड्याचा मुक्त संचार सुरु असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत कायम आहे.गेल्या चार दिवसांपासून शहा शिवारात बिबट्याच्या जोडीचे बछड्यासह दर्शन होत होते. बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास सोनवणे मळ्यातील रामा सोनवणे हे मळ्यातून गावात दूध घालण्यासाठी येत असतांना बिबट्याने दुचाकीचा पाठलाग केला होता. रामा सोनवणे यांनी जवळील वस्तीवर सहारा घेतल्याने बिबट्या माघारी गेला होता. या घटनेची माहिती सरपंच शुभांगी जाधव व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संभाजी जाधव यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागासोबत संपर्क साधून या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली होती.त्यानंतर गुरुवारी सकाळी शहा-कोळगाव रस्त्यावर सोनवणे मळ्यातील ज्ञानेश्वर सोपान राहाणे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात कोंबड्या टाकण्यात आल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नर बिबट्या या पिंजऱ्यात अलगत अडकला. त्यानंतर मादी व बछड्या या भागात संचार करीत होते. घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रीतेश सरोदे, वनरक्षक के. आर. इरकर, वनसेवक नारायण वैद्य, मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी येऊन रात्री ११ वाजता बिबट्याची मोहदरी वनउद्यानात रवानगी केली होती.---------------------------शहा -कोळगाव रस्त्यावर सोनवणे मळ्यात नर बिबट्या जेरबंद झाला असला तरी मादी व बछड्याचा मुक्त संचार सुरु आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी कामावर जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. वनविभागाने या परिसरात पुन्हा पिंजरा लावून मादी व बछडा जेरबंद करण्याची मागणी नवनाथ सोनवणे, संभाजी जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक