शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

पाथर्डीला बिबट्या जेरबंद; लागोपाठ दोन बिबटे पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 21:01 IST

बिबट्याच्या दहशतीच्या सावटाखाली येथील शेतकरी, शेतमजूरांना शेतीची कामे करावी लागत होती. पहाटे तसेच संध्याकाळी बिबट्याचे या भागात दर्शन घडत होते.

ठळक मुद्देतीन ते चार वर्षे वयाची बिबट्या मादी जिल्ह्याबाहेरील जंगलात रविवारी सोडले जाणार

नाशिक : पाथर्डी शिवारातील मळे भागात बिबट्याचा मुक्त संचाराची तक्रार नाशिक पश्चिम वनविभागाला प्राप्त झाली होती. यानुसार येथील एका मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.९) बिबट्या (मादी) जेरबंद झाला. दोन दिवसांत हा दुसरा बिबट्या पिंजऱ्यात आला आहे.

पाथर्डी येथील नितीन डेमसे यांच्या गट क्रमांक१८४ मध्ये वनविभागाने बिबट्याच्या वावराच्या पाउलखुणांवरुन पिंजरा तैनात केला होता. या पिंजऱ्यात सुमारे आठवडाभरापासून बिबट्या जेरबंद होण्याची प्रतीक्षा पाथर्डी शिवाराच्या मळे भागातील शेतकरी वर्ग करीत होता. कारण या भागात बिबट्याचा मुक्त वावराने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याच्या दहशतीच्या सावटाखाली येथील शेतकरी, शेतमजूरांना शेतीची कामे करावी लागत होती. पहाटे तसेच संध्याकाळी बिबट्याचे या भागात दर्शन घडत होते. शनिवारी पहाटे (दि.९) अखेर पिंजऱ्यात बिबट्या अडकला आणि पाथर्डी शिवारातील मळे भागात राहणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.सकाळच्या सुमारास येथील शेतकऱ्यांना पिंजऱ्यातून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आल्याने तत्काळ नागरिकांनी वनविभागाला माहिती कळविली. माहिती मिळताच वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक विजयसिंग पाटील, नाना जगताप, वाहनचालक प्रवीण राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेरबंद झालेला बिबट्याचा पिंजरा स्थानिक नागरिकांच्या मदतीने वन्यप्राणी वाहतुक वाहनात टाकून सुरक्षितरित्या तेथून वनविभागाच्या शहराबाहेरील रोपवाटिकेच्या दिशेने हलविला. पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या हा सुमारे तीन ते चार वर्षे वयाची मादी असल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले. या बिबट्याला जिल्ह्याबाहेरील जंगलात रविवारी सोडले जाणार असल्याचे समजते.--

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीवleopardबिबट्याforest departmentवनविभाग