शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला ऊसशेतीत आढळले बिबट्याचे बछडे; मायेची ऊब पुन्हा मिळवून देण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 22:14 IST

नाशिक पश्चिमच्या हद्दीत भगूरजवळील वडनेर येथील पोरजे यांच्या शेतमळ्यात बुधवारी दुपारी ऊस कापणी पूर्ण करण्यात आली. यावेळी उसाच्या चिपाडाखाली बिबट्यांचे दोन बछडे ऊसतोड कामगारांना नजरेस पडले.

नाशिक : दारणा नदीकाठालगतच्या मौजे वडनेर शिवारातील पोरजे यांच्या ऊसशेतीत आश्रयास असलेल्या बिबट्याच्या मादीने आठवडाभरापूर्वी जन्म दिलेल्या बछड्यापैकी दोन बछडे बुधवारी (दि.26) संध्याकाळी आढळून आले. भक्ष्याच्या शोधात बाहेर पडल्यानंतर असुरक्षिततेची जाणीव झाल्याने मादी-नवजात बछड्यांची ताटातूट झाली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

नाशिक पश्चिमच्या हद्दीत भगूरजवळील वडनेर येथील पोरजे यांच्या शेतमळ्यात बुधवारी दुपारी ऊस कापणी पूर्ण करण्यात आली. यावेळी उसाच्या चिपाडाखाली बिबट्यांचे दोन बछडे ऊसतोड कामगारांना नजरेस पडले. त्यांनी तात्काळ ही बाब शेती मालकाला सांगितली. पोरजे यांनी ल वन विभागाला माहिती कळविली. तात्काळ वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. बछड्यांची पाहणी करुन ते उपाशीपोटी तर नाही ना याचा अंदाज लावण्यात आला. ते सुदृढ असल्याची खात्री पटल्यानंतर पुन्हा जैसे थे पध्दतीने बछड्यांना शेतात सुरक्षित ठेवण्यात आले. तसेच मानव-बिबटया संघर्ष टाळण्यासाठी ऊसशेतीचा संपूर्ण परिसर वनाधिकारी कर्मचाऱ्यांनी निर्मनुष्य केला. तसेच संध्याकाळनंतर कोणीही या भागात घराबाहेर पडू नये, आपली लहान मुले, पाळीव प्राण्यांना सुरक्षितपणे बंदिस्त जागेत ठेवण्याचे आवाहन ध्वनिक्षेपकावरून करण्यात आले.

अंधार पडल्यापासून बराचवेळ मादी बिबट बछड्याच्या जवळपास आल्याचे कॅमेऱ्यात दिसलेले नव्हते. या ठिकाणी 360 अंशात फिरणारा डिजिटल कॅमेरा बसविण्यात आला आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हालचालींवर रात्रभर वनकर्मचारी लक्ष ठेवून होते. 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभाग