बिबट्याचा मेंढपाळ तरुणावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 09:13 PM2021-02-14T21:13:38+5:302021-02-15T00:13:48+5:30

वटार : येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गत एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असुन, दररोज शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांना तो लक्ष्य करीत आहे. शनिवारी (दि.१३) मध्यरात्री वटार शिवारातील गट क्र. २३/१ मधील दशरथ येसा महारनार यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला चढवत काळू दशरथ महारनार यांच्यावर ते झोपेत असतांना हल्ला चढवला. अचानक झालेल्या बिबट्याच्या हल्यामुळे त्यांनी प्रतिकार करीत आपला जीव वाचविला परंतु बिबट्याच्या हल्यात महारनार यांच्या डोक्याला व तोंडाला जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर लगेचच त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leopard attacks young shepherd | बिबट्याचा मेंढपाळ तरुणावर हल्ला

बिबट्याचा मेंढपाळ तरुणावर हल्ला

Next
ठळक मुद्देप्राण वाचले : बोकड ठार ; पशुधन धोक्यात

वटार : येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गत एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असुन, दररोज शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांना तो लक्ष्य करीत आहे. शनिवारी (दि.१३) मध्यरात्री वटार शिवारातील गट क्र. २३/१ मधील दशरथ येसा महारनार यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला चढवत काळू दशरथ महारनार यांच्यावर ते झोपेत असतांना हल्ला चढवला. अचानक झालेल्या बिबट्याच्या हल्यामुळे त्यांनी प्रतिकार करीत आपला जीव वाचविला परंतु बिबट्याच्या हल्यात महारनार यांच्या डोक्याला व तोंडाला जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर लगेचच त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकारानंतर बिबट्याने बापू गोविंद खैरनार यांच्या घराजवळील शेडमधील बोकडावर हल्ला करीत त्याला भक्ष्य केले. एकाच रात्री दोन हल्ले करीत बिबट्याने परिसरात आपली दहशत पसरवली आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांच्याच वाड्यावर हल्ला झाला होता. त्यांतच रात्री पुन्हा बिबट्याने उच्छाद मांडला असून आरडा ओरड केल्याने बिबट्या पळून गेला. नशीब चांगले म्हणून मेंढपाळ तरुणाचे प्राण वाचले. दररोज सायंकाळनंतर बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरातील शेतकरी, नागरिक भयभीत झाले आहेत.

दरवर्षी ह्या परिसरात बिबट्याच्या वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारे असल्याने दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. पण पुन्हा पुन्हा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व मेंढपाळ धास्तावले आहेत.
चौकट...

गेल्या सहा महिन्यात सहा ते सात वेळा हल्ले करून २० ते २५ निष्पपाप मुक्या प्राण्यांचा जीव गेला आहे. अनेक दिवसापूर्वी सावतावाड़ शिवरात बिबट्याचा वावर आहे. वनपाल उडवा उडवीचे उत्तर देऊन वनपाल आपल्या अंगावरचे काम झटकत असतात, सावतावाडी परिसरात बिबट्याचा बऱ्याच दिवसापासून वावर असून दोन तीन शेतकऱ्यांना मुक्त दर्शनही दिले आहे. दरववर्षी पाण्याचा शोधात येथे बिबट्या येतात व पाळीव प्राण्यांना लक्ष्य करीत आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यात सुमारे २५ पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला असून, भक्ष्याच्या शोधत बिबट्याने एका वृद्धेवर लेवर्ती हल्ला केला होता. प्रसंगावधाने या महिलेचे प्राण वाचले होते. वस्तींवर बिबट्या मुक्त दर्शन देत असताना प्रशासन काय करत आहे. असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.

मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने आमच्या वाड्यावर हल्ला चढवत माझ्या झोपलेल्या लहान भावावर हल्ला केला. त्यात त्याच्या डोक्याला व तोंडावर जखमा झाल्या आहेत. याच सुमारास जमलेल्यांनी आरडाओरडा करून बिबट्याला पळवला,
- जीभाऊ महारणर, मेंढपाळ, वटार.

गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या उसाच्या शेतात बिबट्याचा वावर होता पण आता ऊस तोडले गेल्याने मोकळ्या जागेवर बिबट्या दिवसा काटेरी झुडप्यांमध्ये दपुन राहतो त्यामुळे फटाके फोडून शेतात कामे करावी लागत आहेत. या प्रकारामुळे आता गडी, माणसे कामाला यायला घाबरत आहेत.
- शेखर खैरनार, युवा शेतकरी, वटार. 

Web Title: Leopard attacks young shepherd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.