शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 00:54 IST

आगासखिंड येथे बुधवारी (दि.२१) रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने दुचाकीवर झडप घालत युवा शेतकऱ्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. बिबट्याने दुचाकीवर हल्ला चढविण्याची ही या  परिसरातील सातवी घटना असल्यामुळे  शेतकरीवर्गासह दुचाकी चालकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देआगासखिंडचा युवक जखमी : हल्ला होण्याची सातवी घटना

सिन्नर : आगासखिंड येथे बुधवारी (दि.२१) रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने दुचाकीवर झडप घालत युवा शेतकऱ्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. बिबट्याने दुचाकीवर हल्ला चढविण्याची ही या  परिसरातील सातवी घटना असल्यामुळे  शेतकरीवर्गासह दुचाकी चालकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.   आगासखिंड येथील प्रगत ॲग्रोचे संचालक प्रताप विठोबा जाधव (२८) हे बुधवारी (दि.२१) रात्री दहा वाजेच्या सुमारास कडवा कालव्याच्या रस्त्याने  दुचाकीने  आपल्या घराकडे जात असताना कालव्यालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकी चालवत असलेल्या प्रताप जाधव यांच्यावर झडप घातली. जाधव यांचा तोल जाऊन ते खाली पडले. बिबट्याच्या पायाच्या पंजाने जाधव यांच्या डाव्या हातावर गंभीर जखमा झाल्या. प्रताप जाधव यांनी आरडाओरड केल्याने चवताळलेल्या  बिबट्याने अंधारात धूम ठोकली. जखमी जाधव यांना अशोक जाधव, तानाजी जाधव, ओमकार जाधव  व वनविभागाचे सद‌्गीर यांनी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना घरी सोडले. वनविभागाने या घटनेची दखल घेतली असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. दरम्यान,बेलू-आगासखिंड परिसरात दुचाकींवर हल्ला करणाऱ्या व पिंजऱ्यात जेरबंद न होणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने दुसऱ्या पद्धतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आगासखिंडचे सरपंच  शिवाजी आरोटे, माजी सरपंच दत्तू आरोटे, उपसरपंच लहानू बरकले, बेलूचे सरपंच प्रकाश तुपे, संजु तुपे, अंकुश तुपे आदींनी केली आहे.पिंजऱ्याजवळच हल्ला बेलू - आगासखिंड परिसरात बिबट्याचे दुचाकींवर सातत्याने हल्ले सुरूच आहे. गेल्या हप्त्यात बिबट्याने याच ठिकाणी दुचाकीवर झडप घालत ओमकार बरकले व अक्षय बरकले यांना गंभीर जखमी केले होते. बिबट्याच्या या हल्ल्यानंतर वनविभागाने येथे पिंजरा लावलेला आहे. विशेष म्हणजे या पिंजऱ्यापासून हाकेच्या अंतरावरच बिबट्याने प्रताप जाधव यांच्या दुचाकीवर हल्ला करून त्यांना जखमी केले. यामुळे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होण्याची शक्यता धूसरच आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या