शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 20:49 IST

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील बाडगीचापाडा येथील एका शेतकºयावर शेतात काम करीत असताना दुपारच्या वेळेस अचानक बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबाडगीचापाडा : शेतात काम करतानाची घटना

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील बाडगीचापाडा येथील एका शेतकºयावर शेतात काम करीत असताना दुपारच्या वेळेस अचानक बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.तालुक्यातील बाडगीचापाडा येथील शेतकरी सीताराम अमृता कनोजे (६५) हे रविवारी (दि.१०) बाडगीचापाडा शिवारातील आपल्या शेतात काम करीत असताना दुपारी एक वाजेच्या दरम्यान अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला पण या वयोवृद्ध शेतकºयाने निकराने प्रतिकार केला.या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात कनोजे यांच्या कपाळावर डाव्या भुवईच्यावर गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान यावेळी कनोजे यांनी आरडाओरड करीत परिसरात काम करणाºया इतर शेतकºयांना मदतीसाठी हाका मारल्या. त्यावेळी आवाज ऐकून परिसरातील इतर शेतकºयांनी कनोजे यांच्या दिशेने धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले. तसेच तातडीने कनोजे यांना ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांच्यावर उपचार केले. कनोजे यांच्या डाव्या भुवईच्यावर जखम होऊन सहा टाके पडले आहेत.ननाशी परिसरात गेल्या चार ते पाच वर्षांपासून बिबट्याचा उपद्रव नव्हता, परंतु आता पुन्हा बिबट्याचा वावर वाढला असून, परिसरात अनेक शेतकरी मळ्यात वस्ती करून राहतात आणि दिवसाढवळ्या बिबट्याचा हल्ला झाल्याने शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली असून, वनविभागाच्या वतीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीleopardबिबट्या