शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने वासरावर केलेला हल्ला सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 17:21 IST

सिन्नर: तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिवडे येथे बिबट्याने वासरावर हल्ला केल्याची घटना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. शेतकऱ्यांनी बाहेर येऊन आरडाओरड व प्रतिकार केल्याने बिबट्याने जखमी वासराला घटनास्थळी टाकून पळ काढल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार शेतकऱ्यांनी वस्तीवर बसलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सिन्नर: तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिवडे येथे बिबट्याने वासरावर हल्ला केल्याची घटना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. शेतकऱ्यांनी बाहेर येऊन आरडाओरड व प्रतिकार केल्याने बिबट्याने जखमी वासराला घटनास्थळी टाकून पळ काढल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार शेतकऱ्यांनी वस्तीवर बसलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिवडे येथे भाऊसाहेब चव्हाणके यांची भैरवनाथ मळा परिसरात वस्ती आहे. गेल्या दोन महिन्यापासून या वस्तीवर बिबट्या नित्यनियमाने फेरफटका मारायला येत होता, त्यामुळे चव्हाणके यांनी वस्तीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे. दररोज येणार्या या बिबट्याने चव्हाणके यांच्या कुत्र्यावर यापूर्वी ताव मारला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून चव्हाणके कुटुंब बिबट्याच्या दहशतीखाली होते. चव्हाणके कुटुंबीयांनी वस्तीवरील पडवीत सीसीटीव्ही लावून बिबट्या वर नजर ठेवली होती. चव्हाणके त्यांनी एक वासरू व बैल वस्ती बाहेर झाडाला बांधले होते. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास बिबट्याने वस्तीवर प्रवेश केला. दबा धरु न आलेल्या बिबट्याने वासरा वर हल्ला चढवला. वासराने दोरखंड तोडून पळण्याचा करण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने जोरदार हल्ला करत वासराची मान व पाय धरला. बैल व वासराच्या ओरडण्याचा आवाजाने भाऊसाहेब चव्हाणके व त्यांची दोन मुले घरातून बाहेर पळत आली. त्यांनी आरडाओरड करीत बिबट्याच्या दिशेने दगड भिरकावले. यानंतर बिबट्याने जखमी वासराला सोडून धूम ठोकली. दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतरही वनविभागाचे कर्मचारी पंचनामा करण्यासाठी बुधवारी दुपारपर्यंत आले नसल्याची माहिती चव्हाणके यांनी दिली. या परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आह. बिबट्याने या परिसरातील अनेक पाळीव कुत्र्यांना आपले भक्ष केले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक