बिबट्याने जुळवून घेतले; मनुष्यानेही सहजीवन स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:14 AM2021-07-26T04:14:34+5:302021-07-26T04:14:34+5:30

--- नाशिक पूर्वभागातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात ५ जानेवारी २०१९साली एका तीन वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. या ...

The leopard adapted; Man should also accept coexistence | बिबट्याने जुळवून घेतले; मनुष्यानेही सहजीवन स्वीकारावे

बिबट्याने जुळवून घेतले; मनुष्यानेही सहजीवन स्वीकारावे

Next

---

नाशिक पूर्वभागातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात ५ जानेवारी २०१९साली एका तीन वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळी गावकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जाणे स्वाभाविकच होते. त्यावेळी असे लक्षात आले की, आवश्यक साधनसामग्रीची वानवा पूर्व वनविभागाकडे आहे. सध्या वनविभागाकडे आवश्यक ती सर्व अद्ययावत साधनसामग्रीसह प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची रेस्क्यू टीम सुसज्ज आहे.

बिबट-मानव संघर्ष कमी करण्यासाठी नैसर्गिक अधिवासातील त्याचा आणि तृणभक्षी प्राण्यांचा वावर वाढविण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जेणेकरून विस्कळीत झालेली नैसर्गिक अन्नसाखळी सुरळीत होईल. यासाठी जंगलक्षेत्राचा सर्व्हे केला तेव्हा असे लक्षात आले की किमान पाच चौरस किलोमीटरच्या परिघात वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती ‘तजवीज’ करायला हवी. यावेळी प्राधान्याने दिंडोरी, कळवण, चांदवड, निफाड आणि येवला या तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले. या भागातील वनक्षेत्रांत सिमेंट नाले बांध, दगडी बांध बांधले गेले. सिमेंट बंधारे, वनबंधारे विकसित केले. जेथे हे शक्य नाही, तेथे वॉटरहोल पाणवठे तयार केले. मागील तीन वर्षांमध्ये पूर्व भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या मनुष्यहानी झाल्याची अद्याप तरी एकही घटना घडलेली नाही. यासह लोकांमध्ये गाव, आदिवासी पाडे, वस्त्यांवर जनजागृती करण्यावरही भर दिला. तसेच विविध प्रकारचे सूचना फलक बिबटप्रवणक्षेत्र निश्चित करून तेथे उभारले. पोलीसपाटील, सरपंच, संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही यासाठी विश्वासात घेतले. त्यांनाही बिबट्याच्या जीवशास्त्राच्या पद्धतीने समजावून देण्यावर भर दिला. अलीकडेच निफाडमध्ये पोलीस, वनविभागाने संयुक्त मॉकड्रील करत बिबट्या लोकवस्तीत आल्यानंतर रेस्क्यू करावयाच्या आदर्श कार्यपद्धतीवर लक्ष केंद्रित केले. बिबट्याचे जीवशास्त्र सांगणारी डॉक्युमेंटरी तयार केली असून, ही लघुफीत पोलीसदादा, पोलीसदीदींद्वारे तालुक्यांमधील शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा मानस आहे.

- तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक, नाशिक पूर्व वनविभाग

250721\25nsk_37_25072021_13.jpg~250721\25nsk_38_25072021_13.jpg

तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक~तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक

Web Title: The leopard adapted; Man should also accept coexistence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.