शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या तोंडावर डाळी महागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:04 IST

नाशिक : सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वधारल्याने गृहिणींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून, महागाईची झळ स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे बाजारात मुगाची आवक सुरू झाली असतानाही मूगडाळीच्या किमती वधारल्या आहेत. तसेच हरभराडाळ आणि तूर डाळींच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने येत्या काळात डाळींच्या किमती आणखी भडकण्याच्या भीतीने ...

नाशिक : सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वधारल्याने गृहिणींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून, महागाईची झळ स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे बाजारात मुगाची आवक सुरू झाली असतानाही मूगडाळीच्या किमती वधारल्या आहेत. तसेच हरभराडाळ आणि तूर डाळींच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने येत्या काळात डाळींच्या किमती आणखी भडकण्याच्या भीतीने स्वयंपाकघरातील बजेटचा समतोल राखण्याचे गृहिणींसमोर आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी संपूर्ण देशभरात डाळींचे भाव गगनाला भिडल्यामुळे सामान्यांच्या जीवनाचा आधार असणाºया डाळी ताटाबाहेरही गेल्या होत्या. यावर्षीही डाळींचे भाव वधारण्यास सुरुवात झाली असून, गेल्या पंधरवड्यात डाळींच्या किमतींमध्ये सुमारे १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षाप्रमाणेच यंदाही डाळींच्या किमती कडाडण्याची भीती ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे.  ही संधी साधून डाळींचा हंगामी व्यापार करणाºया काळ्याबाजारींकडून डाळींची साठेबाजी होण्याची शक्यता व्यक्त होत असून सरकारने सुरुवातीपासूनच साठेबाजांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या वर्षी डाळींच्या विक्रमी दरवाढीमुळे शहरासह संपूर्ण देशवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे चित्र तत्कालीन परिस्थितीत पहायला मिळाले. ही भाववाढ डाळींची आवक घटल्यामुळे नाही, तर साठेबाजीमुळे झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर सरकाने सर्व राज्य सरकारांना साठेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु, यावर्षी सरकाने सुरुवातीपासूनच खबरदारीची भूमिका घेण्याची गरज ग्राहक आणि व्यापारी वर्गातूनही व्यक्त होत आहे.किमती उतरल्यास ग्राहकांना फायदा नाहीनाशिकमध्ये राजस्थान, इंदूर, लातूर, सोलापूर, बार्शी, जळगाव, अकोला, अकोट या भागातून प्रामुख्याने डाळींचा पुरवठा होतो. यात तूरडाळीसोबतच मूग, उडीद, मसूर व चणाडाळीचे प्रमाण मोठे आहे. डाळींच्या वाहतूक भाड्यापोटी प्रतिक्विंटल सुमारे २०० रुपये खर्च येतो. त्यात दलाल, घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापाºयाचा नफा मिळवून ग्राहकाला पुरवठा होतो. दलाल प्रतिक्विंटल मागे केवळ १२ रुपयांपर्यत नफा कमावतो. तर घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी बहुदा अधिक नफा कमवतात. किरकोळ दुकानदार नफा कमावण्यासाठी डाळींच्या उतरलेल्या किमती बाजारात तत्काळ लागू करीत नाहीत. त्या तुलनेत डाळींचे भाव चढले तर तत्काळ दरवाढ लागू करतात. त्यामुळे डाळींचे भाव उतरल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येत नाही.डाळींचे भाव वधारल्याने पुन्हा मागच्या वर्षासारखीच परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात दीडशे ते दोनशे रुपयांनी डाळी खरेदी कराव्या लागल्या होत्या. यावर्षी पुन्हा सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती वाढू लागल्या असून त्यामुळे घरचे बजेटच बिघडून जाण्याची शक्यता आहे. - ऋजुता तानपाठक, गृहिणीगेल्या वर्षी सर्वच डाळी शंभरी पार कल्यामुळे डाळी खरेदी करताना घरातल्या इतर गरजांना मुरड घालावी लागत होती. त्यामुळे किमान यावर्षी तरी अशाप्रकारे भाववाढ होऊ नये यासाठी सरकारने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. - शिल्पा पिसोळकर