शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अंबोलीतून गाळाचा उपसा

By admin | Updated: May 18, 2016 23:40 IST

लोकसहभाग : तब्बल ३८ वर्षांनी काम सुरू; साठवण क्षमतेत होणार वाढ

 त्र्यंबकेश्वर : शहराची तहान ज्या पाण्यावर भागवली जाते त्या अंबोली धरणातील गाळ लोकसहभागातून तब्बल ३८ वर्षांनी काढण्यास सुरुवात झाली आहे.लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील काही युवा शेतकऱ्यांनी जेसीबी व ट्रकच्या साह्याने गाळ काढणे सुरू केले आहे. गाळ काढण्यासाठी अंबोलीचा कार्यभार असलेले वराटे व त्यांचे सहायक बी.जी. शिंदे यांची परवानगी घेण्यात आली होती. गाळ शेतात टाकण्याच्या अटीवर या कामास परवानगी देण्यात आली. त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार नरेश बहिरम यांनीही येथे भेट दिली आहे. पाण्याचे उद्भव खोल करणे व त्यातील चिखल गाळ, माती शेतीमध्ये टाकावयाची असल्यास तहसील कार्यालयाकडून अडवणूक केली जात नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले. आज धरणातील पाणी तीव्र उन्हाने झपाट्याने कमी होत आहे. उन्हाची दाहकता वाढत आहे. उष्णतेच्या लाटांवर लाटा येत आहेत. त्यामुळे धरणसाठा आणखी कमी होणार आहे. वास्तविक त्र्यंबक नगरपालिकेनेदेखील गाळ काढण्यास सहभाग नोंदविणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

धरण बांधल्यापासून आजपर्यंत धरणातील गाळ कधीच काढण्यात आला नसल्याने हा गाळ (माती) शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शेतकरी स्वखर्चाने गाळाच्या ट्रक आपल्या शेतावर नेत आहेत. यासाठी असलेले जेसीबींच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस पाणी कमी होत असल्याने धरणातील माती-गाळ काढणे सुलभ होत आहे. त्र्यंबक नगरपालिकेने सध्या अहिल्या धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानंतर गंगासागर तलाव, मुकुंद तलाव आदि तलावांतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. परिसरातील जलस्रोतातील गाळ काढण्याची कामे जलदगतीने हाती घेतली आहेत. त्र्यंबकेश्वरपासून ११ कि.मी. अंतरावर अंबोली बंधारा आहे. या बंधाऱ्यातूनच त्र्यंबकेश्वर शहराला १९८७-८८पासून पाणीपुरवठा होत आहे. अंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते विठोबा पाटील मेढे यांच्या सततच्या प्रयत्नाने अंबोली एमआय टॅँक मंजूर करून आणला. सन १९७२च्या दरम्यान या लघु पाटबंधाऱ्याचे काम सुरू झाले आणि १९७८ला धरण पूर्णत्वास आले. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.