शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

विधान परिषद : मते ‘मोजून’ घ्या, मोजून ‘देऊ’ नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:44 IST

नाशिक : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. त्यामुळे उमेदवार निवडून आलाच पाहिजे, त्यामुळे शिवसेनेलाच मतदान करा, अशी तंबी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवाय बाद मतांचे राजकारण टाळण्यासाठी मतदानाची प्रॅक्टिस घेण्याच्या सूचनादेखील केली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेलाच मतदान करा, ठाकरे यांची तंबी!राजकारण टाळण्यासाठी मतदानाची प्रॅक्टिस घेण्याच्या सूचना

नाशिक : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. त्यामुळे उमेदवार निवडून आलाच पाहिजे, त्यामुळे शिवसेनेलाच मतदान करा, अशी तंबी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवाय बाद मतांचे राजकारण टाळण्यासाठी मतदानाची प्रॅक्टिस घेण्याच्या सूचनादेखील केली आहे.विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी पक्ष संघटनेत झालेला फेरबदल आणि त्यानंतर उफाळून आलेली गटबाजी, त्यातच पक्षाच्या पदाधिकाºयांनी बोलविलेल्या बैठकांना नाशिक महापालिकेतील शिवसेनेच्या अत्यल्प गटनेत्यांची उपस्थिती या पार्श्वभूमीवर थेट उद्धव ठाकरे यांनीच हस्तक्षेप केला असून, रविवारी (दि.६) ज्युपिटर हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी उमेदवार निवडून आलाच पाहिजे, अशी भूमिका व्यक्त करून गटबाजी करणाºयांना कठोर इशाराच दिला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे सुमारे दोनशे अधिकृत मतदार असूनदेखील यापूर्वी अल्प उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, यंदा पक्षप्रमुख स्वत: बैठक घेणार असल्याने बोटावर मोजण्याइतपत सदस्य वगळता सर्वच हजर होते. विशेषत: महापालिकेतील नगरसेवकदेखील उपस्थित होते.अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना गेल्यावेळी पक्षाने उमेदवारी दिली होती. यंदा त्यांनी घाई केली असे सांगून उद्धव यांनी सहाणे यांच्याविषयी सहानुभूती दाखविणाºयांनाही गोंजारले. पक्षाने नवीन चेहºयाला संधी दिली असून, उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पक्षाच्याच उमेदवाराला मतदान करा, या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान असल्याने मते बाद होऊ नये यासाठी मतदान कसे करायचे याची प्रॅक्टिस पदाधिकाºयांनी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली. शिवसैनिक निष्ठावान असतात, त्यांना कोणी विकत घेऊ शकत नाही, असे सांगतानाच सर्व शिवसेनेबरोबर आहात ना? दराडे यांना मतदान कोण करणार, असा प्रश्न उध्दव यांनी करताच उपस्थित सर्वांनीच हात वर केले. यावेळी उध्दव यांनी दराडे यांना मते मोजून घ्या,पण मोजून देऊ नका, असा मिश्कील सल्लाही दिल्याचे वृत्त आहे.यावेळी उत्तर महाराष्टÑ संपर्कप्रमुख संजय राऊत यांनी यांनीदेखील उमेदवार निवडीसाठी आवाहन करतानाच मतदान गुप्त असले तरी कोणाला मतदान झाले हे कळू शकते असे सांगून अप्रत्यक्षरीत्या फुटिरांना इशारा दिल्याचे समजते. यावेळी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. बैठकीस रवींद्र मिर्लेकर,भाऊसाहेब चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. उत्तर महाराष्टÑ लढण्यास तयार..उत्तर महाराष्टÑातील लोकसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाºयांच्या बैठका उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. बंद दाराआड झालेल्या बैठकांविषयी नंतर माहिती देताना ठाकरे यांनी सर्वच पदाधिकारी निवडणुका लढण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. शिवसेनेचे स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्या पार्श्वभूमीवर कोकणासह विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. मुंबईत बैठका घेण्यापेक्षा स्वत: त्या त्या विभागात जाऊन बैठका घेण्यावर भर असल्याचेही ते म्हणाले.