शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 02:04 IST

नाशिक : आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुले होत असल्याचा दावा करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर तथा संभाजी भिडे गुरुजींना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत असलेल्या गर्भजल चिकित्सा व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक समितीने दोषी ठरविले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार आहे. समितीच्या शुक्रवारी (दि. १३) झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

ठळक मुद्देआंबा प्रकरण : न्यायालयात दावा दाखल करणार

नाशिक : आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुले होत असल्याचा दावा करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर तथा संभाजी भिडे गुरुजींना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत असलेल्या गर्भजल चिकित्सा व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक समितीने दोषी ठरविले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार आहे. समितीच्या शुक्रवारी (दि. १३) झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.समितीने अहवाल आयुक्त तुकाराम मुंढे यांना सादर केला असून, त्यांच्या संमतीनंतर प्रत्यक्षात कार्यवाही सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. समितीने भिडे यांना नोटीस पाठवून खुलासा करण्यास सांगितले होते; परंतु त्यांनी नोटीस स्वीकारली नाही आणि बाजूही मांडली नाही. त्यामुळे प्रसूतिपूर्व लिंग निदानाची जाहिरात करण्यासंदर्भात ते समितीला कलम २२(७)मध्ये दोषी आढळले आहेत. त्यानुसार आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात वडांगळीकर मठ येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपल्या शेतात आंब्याचे झाड असून, त्याचे आंबे १८० कुटुंबाना आपण दिले आणि त्यापैकी दीडशे जणांना मुलेच झाली, असा दावा केला होता. याबाबत पुणे येथे अतिरिक्त संचालकांकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यांनी महापालिकेला कारवाईसाठी कळविले होते. १८ जून रोजी महापालिकेने पोस्टाने भिडे यांना सांगलीच्या पत्त्यावर नोटीस पाठविला होता. परंतु ते पत्र भिडे यांनी न स्वीकारल्याने माघारी आले होते. भिडे यांचा खुलासा प्राप्त न झाल्याने अखेरीस समितीच्या बैठकीत यावर पुढील भूमिका घेण्याचे ठरविण्यात आले होते.संबंधित समितीने भिडे गुरुजी यांच्या वादग्रस्त विधानासंदर्भात व्हिडीओ फीत बघून खात्री करून घेतली होती. त्यानंतर त्यांना नोटीस बजावली होती. यात आंबे खाल्ल्याने दीडशे जणांना मुले झाली, ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होईल या वक्तव्यावर खुलासा करावा, तसेच त्यांनी नाशिकच्या कार्यक्रमात नमूद केलेली आंब्याची झाडे किती व कुठे आहेत? तसेच ज्या दांपत्यांना आंबे खाल्ल्याने मुले झाली अशांची नावे व पत्त्यानिशी यादी सादर करावी अशाप्रकारचा खुलासा करण्यास सांगितले होते.

टॅग्स :Healthआरोग्यNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका