शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

निवृत्त उपअभियंत्याची ‘एलईडी’प्रकरणी चौकशी

By admin | Updated: June 30, 2016 00:17 IST

महासभेत प्रस्ताव : अनियमिततेचा आरोप

नाशिक : शहरातील अस्तित्वात असलेले पथदीप काढून बीओटी तत्त्वावर एलईडी फिटिंग बसविण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेबद्दल ठपका ठेवत महापालिका आयुक्तांनी विद्युत विभागातील तत्कालीन उपअभियंता (सध्या निवृत्त) नारायण गोपाळराव आगरकर यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. तब्बल चार वर्षांनंतर आयुक्तांनी सदर प्रकरण बाहेर काढत महापालिकेच्या फसवणुकीबद्दल उपअभियंत्यावर दोषारोप ठेवले आहेत. गेल्या चार वर्षांपासून महापालिकेत एलईडी फिटिंगचा घोटाळा चर्चेत राहात आलेला आहे. सुमारे २०२ कोटी रुपयांच्या एलईडी फिटिंगच्या कामात महापालिकेची फसवणूक झाल्याचा आरोप वारंवार महासभांमधून सदस्य करत आलेले आहेत. याबाबत प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. दरम्यान, महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी एलईडी घोटाळाप्रकरणी मुख्य लेखापरीक्षक आणि अधीक्षक अभियंता (भुगयो) यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यानुसार, चौकशी समितीने आपला तपासणी अहवाल सादर केला असून, त्यात बीओटी तत्त्वावर एलईडी फिटिंग बसविणे या कामासंदर्भात निविदापूर्व प्रक्रियेतील त्रुटी, निविदा प्रक्रियेतील त्रुटी, करारनामा व कार्यादेशातील त्रुटी निदर्शनास आल्या. त्यानुसार, विद्युत विभागातील तत्कालीन उपअभियंता नारायण गोपाळराव आगरकर यांची भूमिका संशयास्पद राहिल्याचे समोर आले आहे. सदर तपासणी अहवालावरून आगरकर यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून महापालिकेच्या आर्थिक हिताकडे दुर्लक्ष करून फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आगरकर हे दि. ३१ जानेवारी २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, एलईडी फिटिंगप्रकरणी कार्यादेश हा २८ आॅक्टोबर २०१३ रोजी देण्यात आल्याने घटनेला तब्बल चार वर्षांनंतर आगरकर यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. घटना घडल्यापासून सदर चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून चौकशीसाठी नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या मान्यतेचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)