शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी लवकरच सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:54 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापौर आणि उपमहापौरांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता गृहीत धरली जात असतानाच नगरविकास खात्याने नाशिकसह सर्व महापालिकांना पत्र पाठवून यापूर्वीच्या आरक्षणांची माहिती मागविली आहे. त्यामुळे आता लवकरच सोडत होऊन निवडणुकाही निर्धारित वेळेत होतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशासनाने मागविली माहिती : आचारसंहितेतही निवडणूक होण्याची चिन्हे

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापौर आणि उपमहापौरांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता गृहीत धरली जात असतानाच नगरविकास खात्याने नाशिकसह सर्व महापालिकांना पत्र पाठवून यापूर्वीच्या आरक्षणांची माहिती मागविली आहे. त्यामुळे आता लवकरच सोडत होऊन निवडणुकाही निर्धारित वेळेत होतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.नाशिकसह राज्यातील दहा महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी झाल्या. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका पार पडल्या. नाशिकमध्ये पूर्ण बहुमत असल्याने भाजपाच्या रंजना भानसी महापौर आणि याच पक्षाचे प्रथमेश गिते यांची उपमहापौर यांची निवड करण्यात आली. १५ सप्टेंबर रोजी या दोघांची मुदत संपणार आहे. तथापि, यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे निमित्त करून राज्यातील महापौर आणि उपमहापौरांना दोन वेळा मुदतवाढ मिळाली आहे. आता पुन्हा विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने या धामधुमीत राज्यातील दहा महापालिकांच्या महापौरपदाच्या निवडणुका होतील किंवा नाही याविषयी शंका व्यक्त केली जात होती.नाशिकमध्ये १९९७ पासून आरक्षणाचा लाभनाशिक महापालिकेची स्थापना ७ नोव्हेंबर १९८२ रोजी झाली, तर लोकप्रतिनिधींची राजवट १९९२ मध्ये सुरू झाली. पहिल्या पंचवार्षिक कारकिर्दीत महापौरपदाचा कालावधी एक वर्षाचाच होता. १९९७ मध्ये म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक कारकिर्दीपासून आरक्षणाला सुरुवात झाली.डॉ. शोभा बच्छाव यांची कारकिर्द सुरू असतानाच महापौरांना अडीच वर्षे कालावधीचा निर्णय झाला आहे.ऐन विधानसभेत धामधूमविधानसभेसाठी राजकीय धावपळ सुरू असतानाच महापौरपदाची निवडणुकीचीदेखील रणधुमाळी वाढणार आहे. शासनाने आरक्षणासंदर्भात माहिती मागवली असली तरी प्रत्यक्षात मुदतवाढीचाच निर्णय होण्याची अधिक शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौर