शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

आता शाळेत असतानाच शिका वाहतुकीचे नियम

By admin | Updated: September 23, 2015 00:24 IST

आता शाळेत असतानाच शिका वाहतुकीचे नियम

नाशिक : बेशिस्त वाहतुकीविषयी केवळ ओरड करून उपयोग नाही. वाहतुकीचे नियम पालनासाठी मुळातच संस्कार झाले पाहिजे, हेच लक्षात घेऊन नाशिक फर्स्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे धडे शिकवण्यासाठी महापालिकेच्या सौजन्याने चिल्ड्रेन्स पार्क साकारले असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. शनिवारी (दि. २६) त्याचे उद्घाटन होणार आहे.वाहतूक नियमनावर काम करणाऱ्या नाशिक फर्स्ट या संस्थेने महापालिकेला चिल्ड्रेन पार्कचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार तुपसाखरे लॉन्सच्या पाठीमागील तीन एकर जागा पालिकेने दिली असून त्यावर अनेक कंपन्यांच्या आर्थिक मदतीवर हा प्रकल्प उभा राहिला आहे. या पार्कमध्ये रस्ते, दुभाजक, सिग्नल, वाहतूक बेट, पेट्रोल पंप, पिकअप शेड साकारण्यात आले असून प्रशिक्षणाला येणाऱ्या मुलांना सायकली उपलब्ध करून देऊन त्यांना याठिकाणी वाहतूक नियमाचे पालन करीत कसे जावे याची माहिती दिली जाईल. तत्पूर्वी एक तास अगोदर वाहतुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. दोन तासांच्या या कालावधीत मुलांना वाहतुकीची चिन्हे व त्याचा वापर याबाबतही माहिती दिली जाणार आहे. सदरचे सर्व प्रशिक्षण मोफत सेवाभावी वृत्तीने दिले जाणार असल्याचे अभय कुलकर्णी यांनी सांगितले. शालेय मुलांबरोबरच शनिवारी आणि रविवारी ज्येष्ठ नागरिकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राने प्रकल्पासाठी अडीच कोटी रुपयांची मदत केली आहे. शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.