शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 01:31 IST

नाशिक : आयआयटीसारख्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल रविवारी (दि. १०) जाहीर झाला असून, यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रथम हजार क्रमवारीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार राष्ट्रीय स्तरावरील आयआयटीसारख्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार आहे.

ठळक मुद्देनाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश पसंतीनुसार घेता येणार प्रवेश

नाशिक : आयआयटीसारख्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल रविवारी (दि. १०) जाहीर झाला असून, यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रथम हजार क्रमवारीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार राष्ट्रीय स्तरावरील आयआयटीसारख्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार आहे.नाशिकमधून ऋषभ ललवाणीने प्रथम हजार क्रमवारीतील विद्यार्थ्यांमध्ये २५९ गुणांसह १९३ वी रॅँक प्राप्त केली असून, यश नेहरा याने २०२ वी रॅँक प्राप्त केली आहे. श्रीनिवास कुलकर्णी याने २५७ गुणांसह २१२ वी रँक मिळवली आहे. तर कौस्तुभ भार्गवने २३१ गुणांसह ५४१ रँक मिळवली असून, श्रेयस हवालदार २२५ गुणांसह ६५१ रँक व राज पाटीलने २२५ गुणांसह ६५८ वी रँक प्राप्त करून पहिल्या हजार क्रमवारीतील विद्यार्थ्यांमध्ये रँक मिळवून यश संपादन केले आहे. तर, ध्रुव धिंग्राने ११९४, २०२ गुण मिळविणाऱ्या यश कुलकर्णीला १४६६, अजिंक्य पवार २०७ गुणांसह १२१४, पल्लवी कोचला १८२८, मानव मेहताला २३८६,यश सारडाला ३४९९, अभिषेक पाटील ४६७७ व तेजस तिवारीने ४७४० वी रँक प्राप्त केली आहे. यावर्षी आयआयटी कानपूरतर्फे २० मे रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी २ लाख २४ हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी १८ हजार १३८ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले असून, यात देशभरातील १६ हजार ६२ मुलांनी व २ हजार ७६ मुलींनी यश संपादन केले आहे. यात सर्वसाधारण गटातील ८ हजार ७९४, इतर मागासवर्ग प्रवर्गातील ३ हजार १४०, अनुसूचित जाती गटातून ४ हजार ७०९ व अनुसूचित जमाती प्रवर्गातील १ हजार ४९५ विद्यार्थी आयआयटी व तत्सम संस्थांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले आहे. तर राखीव प्रवर्गातून ज्ञानदीप काळेने ७९ वी, ओबीसी गटातून अभिषेक पाचोरकर १७३ गुणांसह ४८३ वी, विशाल ठाकरे २१४ व भूषण मिसाळने २३४ वी रॅँक प्राप्त केली आहे. आआयटी जेईई अ‍ॅडव्हान्स परिक्षेत नाशिकच्या यश नेहरा, श्रीनिवास कुलकर्णी आणि अभिषेक पाचोरकर यांनी गणित विषयात उल्लेखनीय यश मिळविले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना रोहित सक्सेना यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकexamपरीक्षा