वडनेर भैरव : पुणेगाव कालव्याला सध्या सुरू असलेल्या पूरपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती सुरु आहे. या गळतीमुळे शेतीच्या पिकांचे मोठ्याप्रमाणत नुकसान होत आहे. सदर कालव्याचे काम निकृष्ठ झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या द्राक्षबाग छाटणीचा हंगाम सुरु असून द्राक्ष छाटनी कशी करायची असा प्रश्न शेतक-यांपुढे पडला आहे. पूर पाणी ४० दिवस सुरु राहणार असे अधिकारी सांगत आहे. जर हे पूरपाणी ४० दिवस सुरू राहिले तर द्राक्षबागांच्या छाटणी कश्या करायच्या असा प्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे . हे पूर पाणी जर न्यायचं होत तर आधी पाटाचे कामपूर्ण व्यविस्थत करणचे गरजे होते. निम्या ठिकाणी प्लास्टर बाकी आहे. पाटाचा दोन्ही बाजूने प्लास्टर करणे गरजे होते. लोकप्रतिनिधी फक्त पाणी पुढे नेण्यास सांगत आहे, परंतु पाठीमागे पाटाची काय अवस्था आहे ते बघण्याची गरज आहे. पूर पाणी नेण्यास काहीच अडचण नाही पण प्रथम पाटाचे काम व्यवस्थित करून मग पाणी सोडावे अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांसह चांदवड तहसीलदारांना देण्यात आले आहे.या निवेदनावर विलास कोठुळे निवृत्ती कोठुळे भाऊसाहेब ठाकरे उत्तम भगीरथ कोठुळे, सुरेश कोठुळे ,वाल्मिक पाटील, रामचंद्र अहेर ,पुंजा अहेर , कावेरी कोठुळे , इंदुबाई कोठुळे, गणेश कोठुळे , शर्मिला माधव गवळी आदि शेतकºयांच्या सह्या आहेत.
पुणेगाव कालव्याला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:11 IST