शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

तळवाडे दिगरच्या माध्यमिक शाळेस लावले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:42 IST

तळवाडे दिगर : शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी महाराष्ट्रभर कानाकोपर्यातील शाळांमध्ये बालगोपाळांचे तसेच नवागतांचे स्वागत होत असताना तळवाडे दिगर येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी मात्र शासनाच्या या उपक्र माला केराची टोपली दाखवत चक्क शाळेत वेळेवर न येण्याची तसेच काही शिक्षकांनी दांडी मारण्याची हिम्मत केली आहे.मात्र तळवाड दिगर येथील जागरूक पालकांनी हातात शाळेच्या वेळेच्या पुराव्यासाठी घड्याळ दाखवत शाळेला कुलूप लावून शिक्षकांना चांगलीच अद्दल घडवली असून आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थ संतप्त : शाळेत शिक्षकच आले ऊशिरा तर काहींनी मारली दांडी

तळवाडे दिगर : शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी महाराष्ट्रभर कानाकोपर्यातील शाळांमध्ये बालगोपाळांचे तसेच नवागतांचे स्वागत होत असताना तळवाडे दिगर येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी मात्र शासनाच्या या उपक्र माला केराची टोपली दाखवत चक्क शाळेत वेळेवर न येण्याची तसेच काही शिक्षकांनी दांडी मारण्याची हिम्मत केली आहे.मात्र तळवाड दिगर येथील जागरूक पालकांनी हातात शाळेच्या वेळेच्या पुराव्यासाठी घड्याळ दाखवत शाळेला कुलूप लावून शिक्षकांना चांगलीच अद्दल घडवली असून आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व वर्ग २, ३, ४ कर्मचाऱ्यांनी १०.४५ वाजता शाळेच्या आवारात हजर राहणे आवश्यक आहे. मात्र ११.१५ वाजले तरीही शिक्षक हजर नसल्यामुळे सर्व विद्यार्थी गेटच्या बाहेर असल्याने त्याठिकाणी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. जमलेली गर्दी बघून काही पालक त्याठिकाणी गेले असता शिक्षकच हजर नसल्याचे निदर्शनास आले. संतप्त पालकांनी गावातील सरपंच देविदास अहिरे, पोलीस पाटील गणेश ठाकरे, स्कुल कमिटी चेअरमन ज्ञानेश्वर अहिरे, पंकज ठाकरे, डॉ मुरलीधर पवार, हेमंत पवार, देविदास ठाकरे व इतर पालकांना घटनास्थळी बोलावून घेतशाळेच्या मुख्य प्रवेश द्वाराला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला.शासनाकडून भराती प्रक्रि येबाबत संस्थांना निर्बंध लादण्यात आल्यामुळे या शाळेत पाच ते सहा वर्षांपासून पाच शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तुकड्या वाचवण्यासाठी जून मिहन्यात प्रवेशापुरते पालकांना मानधनावर शिक्षक भरती करतो असे आश्वासन दिले जाते. नंतर मात्र नाममात्र आलेले मान धणावरच्या शिक्षकांना संस्थेचा खर्च होऊ नये म्हणून सोयीने घरचा रस्ता दाखवला जातो.अशा प्रकारच्या सुडबुद्धीच्या शिक्षण व्यवस्थेला कोण जबाबदार आहे. दोन पैसे हाती असलेल्या पालकांनी त्यांची मुलं इतरत्र खाजगी शाळांमध्ये दाखल केली मात्र आमच्याकडे दोन वेळच्या अन्नाच्या सोईपुरताही पैसा नाही मग आमच्या मुलांच्या शिक्षणाचे काय होईल असा सवाल पालकांकडून केला जात आहेदरम्यान सदर घटनबोबत संथाप्रमुख रामा सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही तसेच मुख्याध्यापक काकाजी अहिरे यांनीही पगार पत्रकाचे निमित्त सांगितले.लिपिक खुशाल अहिरे हेही हजर नसल्याने रजा अर्ज अथवा हालचाल नोंदवही पाहता आली नाही. राजेंद्र निकम हे शिक्षक परवानगीशिवाय गैरहजर आढळून आले. घडलेल्या घटनेचे वृत्त पंचायत समिती सटाणा यांना कळविली असता शिक्षण विस्तार अधिकारी टी. के. घोंगडे यांनी शाळेस भेट देऊन पालकांची समज घातली व घडलेल्या घटनेचा लेखी अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला.प्रतिक्रि या-गेल्या अनेक वर्षापासून येथील माध्यमिक शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता पूर्णपणे ढासळली आहे. इयत्ता पहिली पासून ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करू नये या शासनाच्या धोरणामुळे शिक्षकाला परीक्षेच्या निकालाबाबत धाक राहिली नाही.- देविदास अहिरे,सरपंच- तळवाडे दिगर.शासनाचे धोरण हे नेहमी विध्यार्थी केंद्रित असते. विद्यार्थ्यास नापास जरी करावयाचे नसले तरी नैतिकतेचा विचार करून घरी अध्ययन करून अध्यापन करावे. अलीकडच्या काळात अशी मानसिकता शिक्षकांमध्ये राहिली नाही.- पंकज ठाकरे, अध्यक्ष,श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तळवाडे दिगर.येथील विषय शिक्षकांना स्वत:च्या विषयाच्या गाभाभूत घटकांचे ज्ञान असणे क्र मप्राप्त आहे ते ज्ञान शिक्षकाकडे नसल्याचे विद्यार्थ्यांना कसे शिकवत असतील. ज्ञानदान हे अतिशय पवित्र कार्य नव्हे तर ती देशसेवाच आहे. शिक्षकांनी नैतिकता जपावी.- डॉ. मुरलीधर पवार, प्रगतिशील शेतकरीमागील वर्षी अभ्यासक्र म पूर्ण न करता वार्षिक परीक्षा घेण्यात आली. शिकवलेच नाही तर मुलांनी पेपर लिहिलेच कसे. मुलं पास झाली खरी याचा अर्थ मुलांनी पाहून लिहिले किंवा शिक्षकांनी स्वत: पेपर लिहून घेतले. अशा प्रकारे दिशाभूल होत असेल तर येणारी पिढी बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि यास फक्त शिक्षकच जबाबदार राहील.- हेमंत पवार, शेतकरी,तळवाडे दिगर.