सुरगाणा : येथील जलपरिषद मित्र परिवाराच्या ह्यएक झाड लेकीचेह्ण या उपक्रमाचे उदघाटन सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती मनीषा महाले यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणगाव (ता.सुरगाणा) येथून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे.कोरोना सारख्या महामारीच्या संसर्गात ऑक्सिजन घटक महत्वाचा ठरला आहे. या ऑक्सिजन अभावी अनेकांना जीवनातून मुकावे लागले आहे. दिवसेंदिवस जंगलांचा होणारा ऱ्हास, चोरटी जंगलतोड, संवर्धन आणि संगोपन नामशेष होत चालले आहे. यामुळे अनेक जंगले लयास होत चालली आहेत. निसर्गाने दिलेली देणगी फक्त नावापुरतीच जंगलांच्या तालुक्यात उरली आहे. जंगलांचे संवर्धन व संगोपनासाठी आज काळाची गरज निर्माण झाली असून यासाठी सर्वांनीची पुढाकार घ्यावा असे आवाहन सभापती महाले यांनी केले. जलपरिषद मित्र परिवाराच्या एक झाड लेकीचे या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.जलपरिषद मित्र परिवाराने त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा सारख्या आदिवासी बहुल भागात ग्रामस्थांच्या श्रमदानातुन वृक्ष लागवड, जनजागृती मोहीम हाती घेत हजारो विविध जातींच्या वृक्षांचे रोपण केले आहे. लिंबू, चिकू, सीताफळ, आंबा, काजू, पेरू, बोर अशा फळरहित जातीच्या ११ वृक्षांची मुलींच्या हस्ते लागवड करत करण्यात आली आहे.यावेळी यमुना महाले, योगेश महाले, रतन चौधरी, हिरामण चौधरी, नामदेव पाडवी, देविदास कामडी, नितीन गांगुर्डे, नवनाथ गांगुर्डे, मनीषा घांगळे, अनिल बोरसे, पोपट महाले, गणेश सातपुते, हुशार हिरकुड, प्रकाश पवार, केशव पवार, अशोक तांदळे, संजय पढेर आदी उपस्थित होते.निसर्गाच्या समतोलपणासाठी सर्वांनी हिरारीने सहभाग नोंदवावा; पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही वृक्षसंवर्धन तसेच संगोपनासाठी उपाययोजना करीत आहोत. जलपरिषद मित्र परिवाराचा हा स्तुत्य उपक्रम प्रेरणादायी असून तालुक्यात वृक्षवाढीसाठी भर घालणारा आहे. सर्वांनीच या उपक्रमात सहभागी होत मुलींच्या नावे वृक्ष लागवड करावी.- मनीषा महाले, सभापती, प. स. सुरगाणा.
जलपरिषदेच्या 'एक झाड लेकीचे' उपक्रमास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 00:56 IST
सुरगाणा : येथील जलपरिषद मित्र परिवाराच्या ह्यएक झाड लेकीचेह्ण या उपक्रमाचे उदघाटन सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती मनीषा महाले यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणगाव (ता.सुरगाणा) येथून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे.
जलपरिषदेच्या 'एक झाड लेकीचे' उपक्रमास प्रारंभ
ठळक मुद्देठाणगाव (ता.सुरगाणा) येथून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला