शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

जिल्ह्यात  वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:35 AM

राज्याच्या वन मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्यात वनविभागाकडून एक कोटी २७ लाख रोपांची लागवड केली जाणार आहे.

नाशिक : राज्याच्या वन मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्यात वनविभागाकडून एक कोटी २७ लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. या जिल्हास्तरीय उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले गावात करण्यात आला. येथील वनजमिनीवर १६ हजार ५०० रोपे लावण्यात येणार असून, सोमवारी (दि.१) येथे गावकरी, शालेय विद्यार्थ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केले.वनजमिनी व वनेतर जमिनींचे क्षेत्र वृक्षाच्छदनाखाली आणण्यासाठी २०१६ सालापासून सरकारने ५० कोटी रोपे लागवडीचे अभियान अर्थात ‘वनमहोत्सव’ सुरू केला आहे. या अभियानाचे हे अखेरचे वर्ष असून, यावर्षी ३३ कोटी रोपे लागवडीचे ‘टार्गेट’ वन मंत्रालयाकडून संपूर्ण राज्यभरासाठी निश्चित करण्यात आले आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर असा कालावधी या अभियानाचा ठरविण्यात आला आहे. पावसाळ्यात वृक्षलागवड, संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने जनसामन्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि रोपे लागवडीची चळवळ व्यापक बनावी, हा यामागील उद्देश आहे. वनविभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यात एकूण एक कोटी २७ लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. नाशिक पश्चि वनविभाग २६ लाख, तर पूर्व वनविभाग २८ लाख रोपे त्यांच्या वनपरिक्षेत्रांमधील वनजमिनींवर लावणार आहेत. जिल्हास्तरीय वनमहोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी रोहिले येथे प्रमुख पाहूणे म्हणून विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, वनअधिकारी राजन गायकवाड, एस. एम. निरगुडे आदी उपस्थित होते.ग्रामपंचायतींना रोपांचे वाटपजिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मिळून सुमारे ४४ लाख २४ हजार रोपे लावायची आहेत. त्यांना प्रत्येकी तीन हजार २०० रोपांचे कमाल उद्दिष्ट देण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून प्रत्येक ग्रामपंचायतीला रोपे मोफत पुरविली जाणार असून, रोपांचे वाटप सुरू झाले आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींकडून सोमवारी रोपांच्या लागवडीला प्रारंभ करण्यात आला.

टॅग्स :forestजंगलagricultureशेती