मनमाड : येत्या २७ तारखेला होणाऱ्या न.पा. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार,आमदार पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, शहर अध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. रुपाली पगारे यांच्यासह प्रभागातील नगरसेवकांच्या प्रचाराची सुरवात शिवाजी चौकातून करण्यात आली. शहराच्या मुख्य मार्गावरून रॅली काढून महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या वेळी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मान्यवरांनी भाषणातून पक्षाच्या उमेदवारांची भुमिका विषद केली.या वेळी योगेश पाटील, कैलास पाटील, राजेंद्र जाधव, हबीब शेख, सादीक पठाण, कैलास अहिरे, विजय सगळे, मुमताज शेख, रफीक शेख,धनंजय कमोदकर, सुधिर पाटील,प्रकाश बोधक आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ
By admin | Updated: November 16, 2016 01:38 IST