शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

घरपोहोच धान्य योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: October 29, 2014 22:42 IST

घरपोहोच धान्य योजनेचा शुभारंभ

आहुर्ली : म्हसुर्ली येथे अन्नसुरक्षा योजनेला घर पोहोच धान्य वितरण सेवेची जोड देण्यात आली असून, या योजनेअंतर्गत धान्य वितरणाचा शुभारंभ नुकताच झाला आहे. विशेष म्हणजे अन्न सुरक्षा योजनेशी निगडित राबवली जाणारी इगतपुरी तालुक्यातील घर पोहोच धान्य वितरणाची ही पहिलीच सेवा आहे. रेशन दुकानदाराचा मुजोरपणा, काळ्या बाजारात चढ्यादराने विकले जाणारे धान्य व निर्माण करण्यात आलेली कृत्रिम धान्यटंचाई यावर मात करण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने घरपोहोच धान्य वितरण सेवा यशस्वी ठरली आहे. अन्नसुरक्षा योजनच्या रुपाने त्यात आणखी भर टाकून शासनाने नव्या प्रभावी योजनेचा प्रारंभ केला होता. मात्र या योजनेमुळे मधल्या काही काळात घर पोहोच धान्यवितरण सेवेला ब्रेक लागला होता. म्हसुर्ली येथील युवक विजय तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबद तहसीलदार व पुरवठा विभागाच्या आधिकाऱ्यांशी चर्चा करून या दोन्ही योजनांचा संगम करून गोरगरिबांना थेट या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती. प्रशासनानेही यास हिरवाकंदिल दाखवत ही योजना पुन्हा नव्याने सुरू करत म्हसुर्ली येथून तिचा शुभारंभ केला आहे. या योजनेतंर्गत तीन महिने मिळून प्रत्येक लाभार्थ्यांस किमान ६० किलो गहु व ३५किलो तांदुळ मिळणार आहे. योजना राबवणेसाठी तहसीलदार महेंद्र पवार, पुरवठा विभागाचे निकम व बांडे यांचे सहकार्य लाभले आहे.या योजनेचा शुभारंभ म्हसुर्लीचे सरपंच - उपसरपंच, पो.पा.शांताराम तांबे, माजी सरपंच सौ.इंदुबाई शिवाजी पोटकुले, विजय तांबे, शरद तांबे , रेशन दुकानदार गुलाब वाजे , अंकुश क्षीरसागर आदिंच्या उपस्थितीत झाला .(वार्ताहर)