शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: December 4, 2015 21:38 IST

अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा शुभारंभ

त्र्यंबकेश्वर : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे यांच्या हस्ते तालुक्यातील अंबई येथे करण्यात आला. दोन स्तनदा माता व चार गरोदर स्त्रियांना भाकरी, भात, दाळ, हिरवी भाजी अशा चौकस आहाराचे वाटप करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. कुपोषणाबाबत उपस्थितांनी मार्गदर्शन करून दिवसातून एकदा चौकस आहार देण्याचे आवाहन केले.अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण ३३.१ टक्के एवढे आहे. गरोदरपणात शेवटचे तीन महिने व बालक जन्माला आल्यानंतर पहिले तीन महिने पूर्णपणे मातेवर अवलंबून असते. या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे. यावेळी हरसूल व त्र्यंबकेश्वर प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी मोहन तुपे यांनी या योजनेची माहिती दिली. तसेच तालुका आरोग्य (वैद्यकीय) अधिकारी डॉ. योगेश मोेरे, अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डौले, पर्यवेक्षिका सोनवणे, पवार, खोटरे यांनी व्हिडीओ क्लीप दाखवून गरोदरमाता, स्तनदामाता व त्यांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन केले. तर श्रीमती वाटाणे, कुलकर्णी, वाघ आदिंनी गरोदरमाता, स्तनदामाता, बालसंगोपनाबाबत मार्गदर्शन केले.याप्रसंगी पंचायत समिती सभापती गणपतराव वाघ, उपसभापती शांताराम मुळाणे, गटविकास अधिकारी ज्ञानदा फणसे अंगणवाडी सेविका, मदतनीस, सरपंच, ग्रामसेविका तसेच बचतगटाचे महिला मंडळासह महिला उपस्थित उपस्थित होत्या. सूत्रसंचालन पर्यवेक्षिका कुलकर्णी यांनी केले. (वार्ताहर)