नाशिक : पंचवटीतील कालिकानगरमधील एका बंद बंगल्याच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी बंगल्यातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची प्रकार शनिवारी (दि़९) सकाळी उघडकीस आला आहे़रासबिहारी मेरी लिंकरोडवरील गोदावरी रो-बंगलोतील रहिवासी गिरीश मकडू चित्ते हे ५ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत बाहेरगावी गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी बंगल्याच्या हॉलमधील खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश केला़ यानंतर घरातील लोखंडी कपाटातील दहा ग्रॅम सोन्याचे दागिने, एक टॅबलेट व रोख रुपये असा एकूण ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़या प्रकरणी चित्ते यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
पंचवटीतील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास
By admin | Updated: April 11, 2016 00:23 IST