लासलगाव : मरळगोई बुद्रुक सरपंचपदी लता जगताप, तर उपसरपंचपदी राजेंद्र पवार यांची निवड झाली . सरपंचपदासाठी मीना मुदगुल व लता जगताप यांचे अर्ज दाखल झाले होते. सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली लता जगताप यांना पाचपैकी पाच मते मिळाली व मीना मुदगुल यांना पाचपैकी एकही मत मिळाले नाही, उपसरपंचपदासाठी राजेंद्र पवार यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जगताप, राजेंद्र पवार, लता जगताप, मंदा कटोरे, अंजना बर्डे हे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी एन.एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. निवडीनंतर जनार्दन जगताप, केदू जगताप, रामभाऊ जगताप, अंकुश जगताप, चंद्रभान जगताप, संजय दरेकर, केशव जगताप यांनी विजयोत्सव साजरा केला. (वार्ताहर)ओझर सोसायटीची शंभर टक्के वसुलीओझर : येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने ३० जूनपर्यंत बँक पातळीवर १०० टक्के वसुली झाल्याची माहिती चेअरमन शांताबाई कदम,व्हा. चेअरमन सुरेश कदम व सचिव नामदेव गुरुळे यांनी दिली.यावेळी विजय भडके, संजय भिकुले, भाऊसाहेब पगार, रामदास शेजवळ, जगन्नाथ गवळी, रमेश शिंदे, मनोहर जाधव, राजेंद्र कदम, काशीनाथ मंडलिक, शांताराम पल्हाळ, भाऊसाहेब कदम, नामदेव बाबूराव मुसळे आदि उपस्थित होते.
मरळगोईच्या सरपंचपदी लता जगताप
By admin | Updated: July 24, 2014 00:58 IST