शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:21 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत आता अंतिम फेरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी देण्यात आली असून, बुधवारपर्यंत (दि. १२) दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. शहरातील ५७ कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे २७ हजार ९०० जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, दहावीच्या नियमित परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम टप्प्यात पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देअंतिम फेरी : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात ४४७३ जागा रिक्त

नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत आता अंतिम फेरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी देण्यात आली असून, बुधवारपर्यंत (दि. १२) दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. शहरातील ५७ कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे २७ हजार ९०० जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, दहावीच्या नियमित परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम टप्प्यात पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.आतापर्यंत नियमित चार फे ऱ्यांनंतर एक विशेष आणि थेट प्रवेशाची एक फेरी अशा एकूण सहा फेºयांमध्ये ९० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निचित झाले असून, जुलै-आॅगस्ट महिन्यात झालेल्या दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल २८ आॅगस्टला जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण व एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांनाही अकरावी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रवेशप्रक्रिया १२ सप्टेंबरपर्यंत तीन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या गटात ६० टक्क्यांहून अधिक गुण असणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून, शुक्रवारपर्यंत (दि. ७) दुसºया टप्प्यासाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारपासून (दि. ८) दुसºया टप्प्यातील म्हणजेच ३५ टक्क्यांहून अधिक गुण असणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, तिसºया व शेवटच्या टप्प्यात एटीकेटी प्राप्त (एक किंवा दोन विषय अनुत्तीर्ण) विद्यार्थ्यांना दि. ११ व १२ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. अकरावीसाठी आता ४४७३ जागांसाठी १५०६ पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज त्वरित भरून तत्काळ प्रवेश घेण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा