शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

बेकायदा बांधकामांसाठी आज अखेरचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:52 IST

कपाटासह शहरातील विविध बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने वाढवलेली मुदत सोमवारी (दि. ३१) संपणार आहे. त्यामुळे विशेष करून बांधकाम व्यावसायिकांची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देकंपाउंडिंग : वाढीव मुदत सायंकाळी संपणार; व्यावसायिकांची धावपळ

नाशिक : कपाटासह शहरातील विविध बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने वाढवलेली मुदत सोमवारी (दि. ३१) संपणार आहे. त्यामुळे विशेष करून बांधकाम व्यावसायिकांची धावपळ सुरू आहे.दिघे येथील बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्याचा विषय राज्यात गाजला होता. सदरच्या प्रकरणात न्यायप्रविष्ट झाल्यानंतर त्यात तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी कंपाउंडिंग योजना राबविण्याचे ठरविले होते. त्यानुसार राज्यातील महापालिकांना तसे आदेश दिले होते. राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या वतीने बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी प्रथमत: दिलेली मुदत आॅगस्ट महिन्यापर्यंत दिली होती. नाशिकमध्ये बेकायदेशीर बांधकामांबरोबरच कपाट प्रश्न रेंगाळला होता. कपाटाचे क्षेत्र मूळ सदनिकेत समाविष्ट करण्यासाठी अनेकांनी टीडीआरचा पर्याय ठेवला होता, परंतु गेल्या वर्षी राज्य शासनाने कमी रुंदीच्या रस्त्यांवर नाशिकमध्ये टीडीआरवरच निर्बंध घातल्याने हा प्रश्न बिकट झाला होता. त्यातच तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कलम २१० चा वापर करून शहरातील कमी रुंदीचे रस्ते ९ मीटर करण्यासाठीदेखील समसमान जागा दिल्यास वाढीव एफएसआय देण्याची तयारी दर्शविली. कपाट कोंडी सोडविण्यासाठी कंपाउडिंग आणि कलम २१० या दोन्ही योजनांचा वापर करून बांधकामे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे.नाशिकमध्ये आॅगस्ट महिन्यापर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत सुमारे तीन हजार प्रकरणे दाखल झाली आहेत, तर त्यानंतर महापालिकेला पुन्हा मुदत देण्याचे अधिकार देण्यात आल्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आत्तापर्यंत सुमारे चारशे प्रकरणे दाखल झाली आहेत. सोमवारी (दि.३१) या मुदतीचा अखेरचा दिवस आहे.छाननी कधी होणार?महापालिकेच्या वतीने कंपाउंडिंग योजनेअंतर्गत बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी दुसऱ्या टप्प्याची मुदत संपत आली असली तरी अद्याप पहिल्या टप्प्यातील एकाही प्रकरणाची छाननी झालेली नाही. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडून यासंदर्भात पथक मागवले होते, परंतु ते अद्यापही दाखल झालेले नाही. त्यामुळे छाननी कधी होणार याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक