शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

अखेरचे तीन तास... नाशिककरांनो मतदानासाठी बाहेर पडा !

By admin | Updated: February 22, 2017 01:15 IST

व्हॉटस अ‍ॅपवर भावनिक साद : पहिल्या सहा तासांत केवळ ३० टक्के मतदान

अझहर शेख : नाशिक‘नाशिककर पहिल्या सहा तासांत फक्त ३० टक्के मतदान झालयं? हा आकडा नाशिककरांच्या उत्साहाला शोभणारा नाही. यावेळी सर्वाधिक मतदान आपल्या नाशिकमधून करायचयं ना? परंतु ठाणे, पुणे, अकोलासुद्धा आपल्या पुढे...तुम्हाला वाटत नाही का, आपल्या नाशिकसाठी चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यावे? नाशिककरांनो बाहेर पडा, मतदान करा, पुढील पाच वर्षे संधी नाही...आपल्या नाशिकच्या प्रगतीसाठी आपण एवढे तर कराल ना..? लोकशाही सणाचा आनंद लुटा, हा संदेश पुढेही पाठवा.’ अशी भावनिक साद नाशिककरांनी व्हॉट््स अ‍ॅपवरून घातली. बहुसदस्सीय पद्धतीने राबविली जाणारी मतदानप्रक्रिया, नवीन प्रभाग रचना, मतदार याद्यांचा झालेला घोळ, उन्हाची तीव्रता, नावांची शोधाशोध, राहत्या परिसरापासून दूर अंतरावर असलेल्या मतदान केंद्रावर आलेले क्रमांक अशा एक ना अनेक कारणांमुळे नाशिककरांना मतदानाचा हक्क बजावताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती. याचा थेट परिणाम झाला तो मतदानाच्या टक्केवारीवर.  पहिले सहा तास उलटूनदेखील केवळ तीस टक्के मतदान महापालिकेच्या निवडणुकीचे झाल्याने सर्वच जागरूक नेटिझन्सला धडकी भरली. त्यांनी तत्काळ व्हॉट््स अ‍ॅपवरून वरील मजकुराची पोस्ट तयार करून ती विविध ग्रुपमध्ये व्हायरल केली. या पोस्टचा सकारात्मक प्रभाव मतदारांवर पडला. बहुतांश लोकांनी मरगळ झटकून कंटाळा न करता थोडाफार मनस्ताप सहन करण्याची मनाची तयारी करून घराचा उंबरा ओलांडला. ज्या केंद्रांवर दुपारी दोन वाजेपर्यंत तुरळक गर्दी दिसून येत होती त्याच केंद्रांवर चार वाजेनंतर मतदारांनी लोकशाहीचा अधिकार आणि राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी गर्दी केल्याने लांबलचक रांगा परिसरात दिसून येत होत्या. नाशिकच्या मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. जे मतदार साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्रावर पोहचले त्यांना पोलिसांनी सहकार्य करत केंद्राच्या आतमध्ये रांग करा सांगत प्रवेशद्वार बंद केले.