शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

लासलगावी कांदा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:40 AM

लासलगाव : राज्यातील विविध भागांसह गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक वाढल्याने भावात दररोज घसरण होत आहे. त्यामुळे बुधवारी (दि. १०) देखील भावात २०० रुपयांनी घसरण झाली. सरासरी २,७५० रुपये भाव मिळाले. पुणे, लोणंद, जळगाव, अहमदनगरसह गुजरातमधील महुआ व भावनगर बाजारपेठेतील नवीन कांदा बाजारपेठेत दाखल झाल्याने राज्यात तेजीत असलेल्या कांद्याची मागणी कमी झाली आहे. परिणामी सोमवार (दि. ८) पासून कांदा भावात दररोज कमालीची घसरण होत आहे.

ठळक मुद्देदोनशे रुपयांनी घसरण गुजरातमधून आवक वाढल्याचा परिणाम

लासलगाव : राज्यातील विविध भागांसह गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक वाढल्याने भावात दररोज घसरण होत आहे. त्यामुळे बुधवारी (दि. १०) देखील भावात २०० रुपयांनी घसरण झाली. सरासरी २,७५० रुपये भाव मिळाले. पुणे, लोणंद, जळगाव, अहमदनगरसह गुजरातमधील महुआ व भावनगर बाजारपेठेतील नवीन कांदा बाजारपेठेत दाखल झाल्याने राज्यात तेजीत असलेल्या कांद्याची मागणी कमी झाली आहे. परिणामी सोमवार (दि. ८) पासून कांदा भावात दररोज कमालीची घसरण होत आहे.बुधवारी सरासरी व कमाल भावात दोनशे रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली. मागील आठवड्यात कांद्याला १५०० ते ३८०० रुपये व सरासरी भाव ३५४० रुपये होता. सोमवारी भाव घसरून ३१०० रुपयांवर आले.मंगळवार (दि.९) रोजी तर दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन भाव २९०० रुपयापर्यंत गडगडल होते. कांद्याच्या दरात दिवसेदिवस घसरण होत असल्याने उत्पादकात चिंतेचे वातावरण आहे.बाजारपेठेत मागणी कमी, आवक जास्तगेल्या आठवड्यात लासलगाव मुख्य बाजारात लाल कांद्याची १ लाख २८ हजार ५९५ क्विंटल आवक झाली. कांद्याला १००० ते सरासरी ३८०० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला. मात्र देशातंर्गत कांद्याला मागणी कमी झाल्यामुळे भावात घट झाली आहे. त्यातच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशसह राज्यातील विविध भागातून लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे भावात घसरण होत आहे. दोन महिन्यांपासून भाव वाढले असतांना बळीराजाचे दरवाढीचे समाधान अल्पकाळच टिकले आहे.कमाल आणि सरासरी भावात २०० रूपयांची घसरण कायम आहे. लासलगाव बाजारपेठेत कांदा भावात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकात मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जात आहे.कांदा विक्र ी कमी भावाने होऊ लागल्यामुळे आर्थिक अडचणीवर मात कशी करावयाची याचीच शेतकºयात चिंता आहे.- जयदत्त होळकर, सभापती,लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती