शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी शेतकऱ्यांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:53 IST

कांदा निर्यात बंदी हटवा : पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलक पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले

ठळक मुद्देकांदा दरात सातत्याने मोठ्या प्रमाणावर घसरण होत असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत

नाशिक : कांदा दरात होत असलेली घसरण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठवावी या मागणीसाठी विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी लासलगाव येथील बाजार समिती आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी आल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचा पवित्रा प्रारंभी या शेतक-यांनी घेतला परंतु, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलक अर्धा तासांनी टाकीवरुन खाली उतरले.गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात सातत्याने मोठ्या प्रमाणावर घसरण होत असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. त्यातच सरकारने लावलेल्या निर्यातबंदीमुळे शेतक-यांच्या संकटात अधिक भर पडली आहे. सदर निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतक-यांकडून मागणी केली जात आहे. त्यासंबंधी खासदारांसह बाजार समितीच्या पदाधिका-यांनीही केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेत निवेदने दिली आहेत. परंतु, सरकारने फक्त कृष्णपूरम कांदद्याला निर्यातीची परवानगी दिल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यामुळे शुक्रवारी (दि.७) कांदा निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी राज्य कांदा उत्पादकांची संघटना, प्रहार शेतकरी संघटना व जय किसान फोरम यांच्या कार्यकर्त्यांनी शेतक-यांसह बाजार समिती आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढत शोलेस्टाईल आंदोलन केले. राज्य कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे, गणेश निंबाळकर तसेच निवृत्ती न्याहारकर यांच्यासह प्रकाश चव्हाण, उध्दव न्याहारकर, आनंद भोसले , सागर पूरकर, हरी ठाकरे, शंकर गायखे, महेश भोसले, शिवाजी न्याहारकर, खंडू न्याहारकर , खंडु गांगुर्डे, निळोबा न्याहारकर, गोकुळ न्याहारकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान नायब तहसीलदार योगेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.अर्धा तास आंदोलनशेतक-यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू करताच बाजार समितीचे प्रशासन व पोलिसांची धावपळ उडाली. दुपारी २ ते २.३० वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निवेदन घेण्यासाठी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक आर.एस सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर अर्धा तासांनी आंदोलक खाली उतरले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी