शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी दोन्ही संस्थांना कांदा खरेदीस परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 16:13 IST

लासलगाव : नाफेडच्या वतीने नोडल एजन्सी म्हणून विंचुर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्था व लासलगावच्या व्हेफको संस्थेला मान्यता दिली असल्याचे कागदपत्र पडताळणीत स्पष्ट झाल्यानंतर दोन्हीही संस्थांना शुक्रवारी (दि.४) झालेल्या बैठकीत लासलगाव बाजार समितीत कांदा खरेदीसाठी परवानगी देण्यात आली. सदर तिढा सुटल्यानंतर सकाळच्या सत्रात कांदा लिलाव झाले.

लासलगाव : नाफेडच्या वतीने नोडल एजन्सी म्हणून विंचुर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्था व लासलगावच्या व्हेफको संस्थेला मान्यता दिली असल्याचे कागदपत्र पडताळणीत स्पष्ट झाल्यानंतर दोन्हीही संस्थांना शुक्रवारी (दि.४) झालेल्या बैठकीत लासलगाव बाजार समितीत कांदा खरेदीसाठी परवानगी देण्यात आली. सदर तिढा सुटल्यानंतर सकाळच्या सत्रात कांदा लिलाव झाले. लासलगाव येथील बाजार समिती आवारात गुरूवारी (दि.३) नाफेडचे वतीने एजन्सी मिळालेल्या विंचुर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने श्रीमती साधना जाधव यांनी कांदा खरेदीसाठी बोली लावली होती. त्यावेळी व्यापाऱ्यांनी सदर संस्थेकडे अधिकृत परवाना नसल्याचे कारण दर्शवत लिलाव बंद पाडले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांसह बाजार समिती प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रशासन व व्यापारी यांच्यात बैठक होऊन दोन्ही संस्थांच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच त्यांना लिलावात सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले होते. त्यानुसार, शुक्रवारी (दि.४) बाजार समितीत झालेल्या बैठकीत दोन्ही संस्थांना अधिकृत एजन्सी म्हणून मान्यता असल्याने त्यांना कांदा खरेदी लिलावासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला बाजार समिती सभापती सौ, सुवर्णा जगताप , सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह संचालक रमेश पालवे, कृषी साधना संस्थेच्या साधना जाधव, व्यापारी वर्गाचे वतीने नंदकुमार डागा, नितीन जैन, मनोज रेदासणी, बाळासाहेब दराडे, हेमंत राका, विवेक चोथाणी व प्रविण कदम उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या लिलावात सकाळी २७ हजार क्विंटल कांदा आवक होऊन भाव ७०० ते २१९१ व सरासरी १८२५ रूपये जाहीर झाले.

टॅग्स :Nashikनाशिक