आयटीआर २ भरणाऱ्यांची संख्या मोठी

By प्रसाद गो.जोशी | Published: August 29, 2020 11:04 PM2020-08-29T23:04:11+5:302020-08-30T01:09:40+5:30

नाशिक : देशव्यापी लॉकडाऊनमुळे ज्या करदात्यांना करनिर्धारण वर्ष २०१८-१९ साठीची आपली प्राप्तिकराची विवरणपत्रे विहित मुदतीमध्ये भरता आली नाहीत, त्यांच्यासाठी देण्यात आलेल्या वाढीव मुदतीमध्ये २१.५ लाखांहून अधिक विवरणपत्रे दाखल झाली आहेत.

Large number of ITR 2 applicants | आयटीआर २ भरणाऱ्यांची संख्या मोठी

आयटीआर २ भरणाऱ्यांची संख्या मोठी

Next
ठळक मुद्दे२१.५ लाख विवरणपत्रे दाखलजुलैअखेरची स्थिती ।

प्रसाद गो. जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : देशव्यापी लॉकडाऊनमुळे ज्या करदात्यांनाकरनिर्धारण वर्ष २०१८-१९ साठीची आपली प्राप्तिकराची विवरणपत्रे विहित मुदतीमध्ये भरता आली नाहीत, त्यांच्यासाठी देण्यात आलेल्या वाढीव मुदतीमध्ये २१.५ लाखांहून अधिक विवरणपत्रे दाखल झाली आहेत.
देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यातच प्राप्तिकराची विवरणपत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख येत असल्याने आयकर विभागाकडून ही तारीख वाढवून देण्यात आली. या मुदतीमध्ये २१,५०,५३० विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत.
या कालावधीमध्ये ४,८६,७३३ करदात्यांनी आयटीआर १ मधील विवरणपत्रे दाखल केली आहेत. आयटीआर-२ मधील विवरणपत्रे दाखल करणाऱ्यांची संख्या १,१२,२५३ एवढी आहे. अन्य प्रकारची विवरणपत्रे दाखल करणाºयांची संख्या त्यामानाने कमी आहे. ३१ मार्च पर्यंत ६,७७,९०,६६० विवरणपत्रे दाखल झाली होती.
त्यामुळे वाढीव कालावधीमध्ये दाखल विवरणपत्रांची टक्केवारी ३.१७ एवढी झाली आहे. यामध्ये आयटीआर१ १.४८ टक्के तर २.२५ टक्के आयटीआर२ यांचे प्रमाण आहे. प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी मिळालेल्या वाढीव मुदतीचा लाभ अनेकांनी घेतला.महाराष्टÑ राहिला अव्वलस्थानावर ३१ मार्च रोजी दाखल विवरणपत्रांची राज्यवार विभागणी बघता महाराष्टÑ हा अव्वलस्थानी राहिला आहे. या कालावधीत महाराष्टÑामधून १,०५,८६,४७२ एवढी विवरणपत्रे दाखल झाली. ६६,७८,०८२ विवरणपत्रे दाखल करणारा गुजरात दुसरा तर ६३ लाखांहून अधिक विवरणपत्रांसह उत्तरप्रदेश तिसºया स्थानी राहिला. सर्वात कमी म्हणजे अवघी १३१ विवरणपत्रे लडाख या केंद्रशासित प्रदेशातून दाखल झाली आहेत. ४१५१ विवरणपत्रे दाखल झालेले मिझोरम हे तळाचे राज्य आहे.

Web Title: Large number of ITR 2 applicants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.