नाशिक : भारतातील एकूण राष्ट्रीय उत्पादनात जवळपास ३० टक्के वाटा हा लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा असून, हे लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे प्रतिपादन आर्थिक विश्लेषक राजेश तांबे यांनी केले. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात मोठ्या प्रमाणात ग्राहक असून, या सर्वांच्या गरजेच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे प्रतिपादन आर्थिक विश्लेषक राजेश तांबे यांनी केले. उंटवाडीतील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात जागतिक गुंतवणूकदार सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे रविवारी (दि.५) जागतिक गुंतवणूकदार सप्ताहानिमित्त बदलत्या अर्थकारणातील गुंतवणुकीच्या संधी या विषयावर ते बोलत होते. राजेश तांबे म्हणाले, महागाई वाढत असताना उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरते. परंतु गुंतवणुकीच्या नावाखाली आपली फसवणूक होऊ नये, याची खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरते. यासाठी गुंतवणूक करताना प्रलोभणांना बळी न पडता किंवा दुसऱ्यांचे अंधानुकरण न करता बदलते तंत्रज्ञान आणि समाजाच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादनांना प्राधान्य देणाºया कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. सीडीएसएलचे (सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड)चे अजित मंजुरे यांनी अर्थसाक्षरतेविषयक राबविल्या जाणाºया विविध उपक्रमांविषयीची माहिती दिली. सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रादेशिक सचिव संजय मोरे यांनी केले. यावेळी महेश सावरीकर, प्रवीण काकड, झाकीर मन्सुरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्चना जांगडा यांनी केले. प्रा. दीपाली चांडक यांनी आभार मानले.
लघु व मध्यम उद्योगात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी -राजेश तांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 18:46 IST
भारतातील एकूण राष्ट्रीय उत्पादनात जवळपास ३० टक्के वाटा हा लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा असून, हे लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे प्रतिपादन आर्थिक विश्लेषक राजेश तांबे यांनी केले.
लघु व मध्यम उद्योगात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी -राजेश तांबे
ठळक मुद्देलघु-मध्यम उद्योगाचा जी़डीपीत ३० टक्के वाटालघु उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आर्थिक विश्लेषक राजेश तांबे यांचे प्रतिपादन