वणी : जमिन विक्र ी व त्याचे खरेदीखत करु नही जमिन तसेच पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन संशयितांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर दिंडोरी पोलीसांनी ठकबाजी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.संजय रामदास जाधव (रा. गोपाळनगर ,अमृतधाम, पंचवटी,नाशिक) यांनी सुरत चिमण उर्फ चिंतामण पाटील (रा. अवनखेड, ता. दिंडोरी) यांचेकडुन मध्यस्थांमार्फत १३ लाख ९ हजार रु पयांचा व्यवहार करु न जमिन खरेदी केली होती. दिंडोरीच्या उपनिबंधक कार्यालयात व्यवहार पुर्णतेनंतर खरेदीखत करण्यात आले. मात्र व्यवहार पूर्ण होउनही जमिन ताब्यात दिली नाही तसेच जमिन द्यावयाची नसल्यास व्यवहारापोटीची रक्कम परत मिळावी अशी भूमिका जाधव यांनी घेतली. परंतु त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जाधव यांनी न्यायालयात तक्र ार केली असता ठकबाजी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात दोन संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमिन विक्री फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:11 IST
दिंडोरी पोलीस ठाण्यात दोन संशयीताविरोधात गुन्हा दाखल
जमिन विक्री फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल
ठळक मुद्देजाधव यांनी न्यायालयात तक्र ार केली असता ठकबाजी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत