शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाच्या  विरोधकानेच दिली रस्त्यासाठी बागायती जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:48 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाºया शेतकरी संघर्ष समितीच्या इगतपुरी तालुका अध्यक्षानेच त्याची आई व मुलाच्या नावे असलेली बागायती जमीनच समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने शासनाला विक्री केली असून, समृद्धीविरोधी भूमिका घेणाºया संघर्ष समितीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

ठळक मुद्देबागायती जमीनच समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदी संघर्ष समितीला मोठा धक्का ४८७ शेतकºयांना २३८ कोटीहून अधिक रक्कम

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाºया शेतकरी संघर्ष समितीच्या इगतपुरी तालुका अध्यक्षानेच त्याची आई व मुलाच्या नावे असलेली बागायती जमीनच समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने शासनाला विक्री केली असून, समृद्धीविरोधी भूमिका घेणाºया संघर्ष समितीला हा मोठा धक्का मानला जात आहे.समृद्धी महामार्गाला जागामालक शेतकºयांचा होणारा विरोध हळूहळू कमी होत चालला असून, १६ नोव्हेंबरपर्यंत प्रशासनाने २०४ हेक्टर जमीन थेट खरेदीने ताब्यात घेतली आहे. त्यात सर्वाधिक विरोध करणाºया सिन्नर तालुक्यातील १४० हेक्टर, तर इगतपुरी तालुक्यातील ६४ हेक्टर जागेचा समावेश असून, या जागेच्या मोबदल्यापोटी ४८७ शेतकºयांना २३८ कोटीहून अधिक रक्कम त्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. शासनाने जमिनीच्या मोबदल्यासाठी पाचपट भाव दिल्यामुळे शेतकरी जागा देण्यास तयार होत असून, त्यात प्रशासनातील अधिकारीही त्यांचे मन वळविण्यात यशस्वी झाले आहेत. अशातच समृद्धी महामार्गाला जागा देण्यास विरोध करणाºया शेतकरी संघर्ष समितीचा दुसरीकडे विरोध अजून कायम असून, त्यासाठी न्यायालयीन व राजकीय लढा लढला जात आहे.विशेष म्हणजे, इगतपुरी तालुक्यात समृद्धीविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात कचरू पाटील- डुकरे हे आजवर सर्वात अग्रेसर होते. जमिनीच्या मोबदल्यात पाटील यांना तीन कोटी ७२ लाख ७६ हजार १४६ रुपये अदा करण्यात आले आहेत. बुधवारी उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, इगतपुरीचे प्रांत राहुल पाटील, तहसीलदार बबन काकडे यांनी कचरू पाटील यांच्याकडून खरेदी घेतली व त्याची रीतसर दुय्यम निबंधकांकडे नोंदही करण्यात आली.शेतकरी संघर्ष समितीचे इगतपुरी तालुक्याचे अध्यक्ष कचरू पाटील- डुकरे यांची पिंपळगाव डुकरा येथे आई गंगूबाई दादा डुकरे व मुलगा संजय कचरू डुकरे यांच्या नावे असलेली सुमारे दोन हेक्टर ४२ आर बागायती जमीन समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने घेण्यात आली आहे.

टॅग्स :National Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6nagpurनागपूर